बांगलादेशची पुन्हा लाज गेली! या संघाचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सोबत खेळण्यास नकार, झालं असं की…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या निर्णयात एकाकी पडल्याचं दिसत आहे. सर्वच बाजूने बांगलादेशची कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. आता भारतात सामना खेळा किंवा स्पर्धेतून माघार घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची जगभरात नाचक्की झाली आहे. आधी पाकिस्तानच्या नादाला लागून भारतात खेळणार नाही वगैरे वल्गना केल्या. आता या सर्व वल्गना अंगाशी आल्याचं दिसत आहे. आयसीसी बैठकीतही बांग्लादेश बोर्डाचं नाक कापलं गेलं आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत बांगलादेशच्या बाजूने फक्त पाकिस्तानने मत टाकलं होतं. तर 14 जणांनी बीसीसीआयच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्ड तोंडावर आपटलं होतं. दुसरीकडे, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या ग्रुप बदलण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. कारण या गटातील संघाने बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. हा संघ दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द श्रीलंका आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षांना मीडियाशी चर्चा करताना याबाबत खुलासा केला आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षांनी सांगितलं की, ‘त्यांनी त्यांचे सामने श्रीलंकेत शिफ्ट करण्याच प्रस्ताव दिला आहे. पण आम्हाला असं वाटतं की बांगलादेशी क्रिकेटपटूंसाठी श्रीलंका सुरक्षित नाही.’ या गोष्टीची री ओढताना त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, आम्ही आमच्या गटात कोणता नवा संघ नको. बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात चांगले संबंध आहे. दोन्ही देशात क्रिकेट मालिका होत असतात. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेने भारताच्या पारड्यात कौल दिला. आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडे भारतात खेळण्याशिवाय पर्याय नाही. काही तासात बीसीबीला आपला निर्णय आयसीसीला कळवणं भाग आहे. जर त्यांनी भारतात खेळण्यास नकार दिला तर स्कॉटलँडचा संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल.
🚨 The BCB faced a direct rejection from Sri Lanka, the country they believed would be the safest option for their cricketers ❌#T20WorldCup | #BangladeshCricket pic.twitter.com/46kmRg2TLp
— Cricketangon (@cricketangon) January 22, 2026
बांगलादेशची नाटकी सुरूच
आयसीसीने दिलेल्या डेडलाईनंतरही बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या निर्णयात काहीच बदल झालेला नाही. बीसीबी अध्यक्षांनी सांगितलं की, ‘मी आयसीसीकडून एखाद्या चमत्काराची अपेक्षा करत आहे. वर्ल्डकपमध्ये कोणाला खेळण्याची इच्छा नसते? बांगलादेशला वर्ल्डकप खेळायचा आहे. बांग्लादेश सरकारला वाटतं की बांगलादेशने वर्ल्डकप खेळावा. पण आमच्या खेळाडूंसाठी भारत सुरक्षित नाही. कोणतंही सरकार निर्णय घेण्यापूर्वी फक्त खेळाडूच नाही तर इतर गोष्टीही लक्षात ठेवते. मी आयसीसी बोर्डाकडे आपल्या सरकारसोबत बोलण्याचा शेवटचा वेळ मागितला आहे.’
