AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! देवदर्शनाहून परतणाऱ्या पिकअपला कंटेनरची धडक, 2 जण ठार

धाराशीवमधून मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिवच्या जवळील आळणी फाटा येथे पिकअप-कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात देवदर्शनावरून परतणारे 6 ते 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! देवदर्शनाहून परतणाऱ्या पिकअपला कंटेनरची धडक, 2 जण ठार
Dharashiv AccidentImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 29, 2026 | 10:15 PM
Share

धाराशिवमधून मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिवच्या जवळील आळणी फाटा येथे पिकअप-कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात देवदर्शनावरून परतणारे 6 ते 7 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पिकअपमधील प्रवासी देवदर्शन करून परतत असताना हा अपघात झाला आहे. 7 जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धाराशीवमध्ये भीषण अपघात

समोर आलेल्या माहितीनुसार, आळणी फाटा येथे देवदर्शनावरून भाविकांना घेऊन परतणाऱ्या पिकअपचा कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या दोन्ही वाहनांची धडक इतकी भीषण होती की यात पिकअपचा चुराडा झाला आहे. या अपघाता 6 ते 7 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. बब्रुवान सूर्यवंशी (वय 68), छबुबाई दूधभाते (वय 52) अशी मृत भाविकांची नावे आहेत. हे दोघेही उमरगा तालुक्यातील बोरी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील जखमींना तातडीने धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जळगावमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू

जळगावमधील इच्छादेवी चौकात कार- दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे, यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. लीलाधर मंगल पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्या 36 वर्षीय दुचाकीस्वाराचे नाव असून कंपनीत कामावर जाताना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात कारमधील चार जण देखील गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर कार दुभाजकाला धडकून दोन वेळा रस्त्यावर उलटली. या अपघात प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासह पुढील कारवाई सुरू आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा