AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या महिला विवाहित पुरुषासोबत अफेअर करतात त्या..; काजोलची बहीण स्पष्टच बोलली

अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जीने एक्स अकाऊंटवर लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. विवाहित पुरुषांसोबतच्या अफेअरबद्दल तिने ही पोस्ट लिहिली आहे. तनिषाने नेमकं काय म्हटलंय, ते जाणून घ्या..

ज्या महिला विवाहित पुरुषासोबत अफेअर करतात त्या..; काजोलची बहीण स्पष्टच बोलली
काजोल आणि तनिषा मुखर्जीImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 15, 2026 | 8:47 PM
Share

अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी तिच्या एक्स अकाऊंटवर वेगवेगळ्या विषयांवर आपली बेधडक मतं आणि प्रतिक्रिया व्यक्त करत असते. नुकतीच तिने अशा महिलांबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे, ज्या विवाहित पुरुषांसोबत अफेअर ठेवतात. तनिषाने म्हटलं की, अशा महिला फेमिनिस्ट (स्त्रीवादी) नसून ‘महिलांच्याच विरोधात’ असतात. तिने अशा महिलांना चुकीचंही ठरवलं आहे.

या पोस्टमध्ये तनिषा मुखर्जीने लिहिलं, ‘माझं असं मत आहे की, ज्या महिला विवाहित पुरुषांसोबत अफेअर ठेवतात, त्या फेमिनिस्ट नसतात. खरं तर त्या महिलांच्याच विरोधात असतात. कारण दुसऱ्याच्या पतीसोबत संबंध ठेवणं म्हणजे त्या पुरुषाच्या पत्नीचा अपमान करणं आहे. यात त्या पुरुषाचीही चूक आहे. त्याचं चारित्र्य योग्य नाही आणि ज्या महिला विवाहित पुरुषांच्या मागे लागतात, त्या वाईट असतात. त्यांनी आपल्या मुलांसाठी रोल मॉडेल बनू नये. मी जे म्हणाले ते म्हणाले.’

तनिषाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या मताशी सहमती दर्शवली. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, ‘अगदी बरोबर, दोघंही समान जबाबदार आहेत.’ आणखी एका युजरने लिहिलं, ‘अगदी खरं. जाणूनबुजून कोणाचंही लग्न मोडणाऱ्या व्यक्तीला पुरुष किंवा स्त्रीचा विचार न करता सर्वांसमोर आणलं पाहिजे.’

गेल्या वर्षी ‘मेल फेमिनिस्ट पॉडकास्ट’मध्ये तनिषाने फेमिनिझमबद्दल तिचे विचार मांडले होते. भारतात महिलांचा आदर करण्याची संस्कृती मजबूत असल्याचं तिने म्हटलं होतं. “हो, आपल्याकडे काही समस्या आहेत, पण याचं कारण आपल्या संस्कृतीत महिलांचा आदर केला जात नाही असं नाही. हिंदू धर्मात महिलांचा आदर केला जातो. हे पुरुष आणि महिला दोघांच्याही मनात रुजलेलं आहे. मात्र, ब्रिटिशांमुळे आपली संस्कृती खराब झाली आणि वाढत्या लोकसंख्येमुळे आपला समाज बिघडला,” असं तिने म्हटलं होतं.

तनिषाने 2003 मध्ये करण नाथ आणि डिनो मोरिया यांच्यासोबत ‘श्शssss’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने ‘सरकार’, ‘नील एन निक्की’ आणि तमिळमधील हिट चित्रपट ‘उन्नाले उन्नाले’मध्ये काम केलं. 2013 मध्ये ‘बिग बॉस 7’मध्ये फर्स्ट रनर-अप ठरल्यानंतर तनिषाला मोठी लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये अरमान कोहलीसोबतच्या तिच्या नात्याचीही बरीच चर्चा झाली होती.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा