AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर मराठा समाजाचे नुकसान होईल जरांगेंना सांगितले, देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची प्रतिक्रिया!

आंदोलने चालतच असतात. यापूर्वीही त्यांनी आंदोलन केलेले आहे. पुढेही ते आंदोलन करू शकतात. उलट यावेळी त्यांनी केलेल्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या. त्यांनी एकूण 13 मागण्या केल्या होत्या. त्यातील 12 मागण्या मान्य करण्यात आल्या. जी मागणी मान्य होऊ शकत नव्हती त्याबाबत कायद्याची अडचण काय आहे हे त्यांना समजावून सांगण्यात आलं, अशी माहितीही यावेळी फडणवीस यांनी दिली.

तर मराठा समाजाचे नुकसान होईल जरांगेंना सांगितले, देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची प्रतिक्रिया!
devendra fadnavis and manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2026 | 8:20 PM
Share

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे यांनी दोन वेळा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांना परवानगी मागितली. परंतु दोन्ही वेळा पोलिसांनी त्यांना आंदोलनास नकार दिला. आता पुन्हा एकदा जरांगे यांनी आंदोलनासाठी नव्याने अर्ज केला आहे. दुसरीकडे काहीही झालं तरी मी मुंबईला जाणारच आहे. माझ्यासोबत मराठा बांधव नसतील. मी एकटाच आझाद मैदानात आंदोलन करणार आहे, असं जरांगे यांनी जाहीर केलं असून त्यांनी आता मुंबईच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कोर्टाच्या विरोधात गेलो तर मराठा समाजाचं नुकसान होईल, असं महत्त्वाचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

सणाला कुठलेही विघ्न येऊ नये

कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. कोणाला आंदोलनाला परवानगी द्यायची आणि कोणाला नकार द्यायचा याबाबतचा अर्ज पोलीस घेतात. जरांगे यांचा आलेला अर्ज पोलिसांनी नाकारला आहे. जरांगे यांनी पुन्हा अर्ज केला आहे. त्यावर पोलीस विचार करतील. आमची अपेक्षा एवढीच आहे की, मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात गणेशोत्सव हा प्रचंड मोठा सण असतो. हिंदू समाजातील हा खूप मोठा सण आहे. हा सण सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. या सणाला कुठलेही विघ्न येऊ नये अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

तर मराठा समाजाचं नुकसान होईल

तसेच, आंदोलने चालतच असतात. यापूर्वीही त्यांनी आंदोलन केलेले आहे. पुढेही ते आंदोलन करू शकतात. उलट यावेळी त्यांनी केलेल्या सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या. त्यांनी एकूण 13 मागण्या केल्या होत्या. त्यातील 12 मागण्या मान्य करण्यात आल्या. जी मागणी मान्य होऊ शकत नव्हती त्याबाबत कायद्याची अडचण काय आहे हे त्यांना समजावून सांगण्यात आलं, अशी माहितीही यावेळी फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना आपण कोर्टाच्या विरोधात गेलो तर मराठा समाजाचं नुकसान कसं होईल याबाबतही जरांगे यांना समजावून सांगण्यात आलं आहे. अशा पद्धतीने भूमिका न घेता सणासुदीच्या दिवसांत लोकांना कुठलाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे, असंही फडणवीस म्हणाले. त्यामुळे जरांगे माघार घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा