AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटपटू रिकू सिंह अन् खासदार प्रिया सरोज यांच्या लग्नाची तारीख अ्न ठिकाण ठरलं, दोन्ही कुटुंबांत जल्लोष

Rinku Singh Priya Saroj Wedding : रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा पार पडला होता. 8 जून 2025 रोजी लखनऊमधील सेंट्रम हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला. आता जवळपास दीड वर्षानंतर दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.

क्रिकेटपटू रिकू सिंह अन् खासदार प्रिया सरोज यांच्या लग्नाची तारीख अ्न ठिकाण ठरलं, दोन्ही कुटुंबांत जल्लोष
Rinku Singh Priya Saroj Wedding Image Credit source: social media
| Updated on: Sep 15, 2026 | 8:41 PM
Share

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. 4 डिसेंबर 2026 रोजी लखनऊमधील रमाडा हॉटेलमध्ये त्यांचा विवाह होणार आहे. लग्नाची तारीख ठरल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये उत्साहाचं वातावरण असून लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांची 8 जून 2025 रोजी लखनऊमधील सेंट्रम हॉटेलमध्ये साखरपुडा झाला होता. या खास सोहळ्याला समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, अभिनेत्री जया बच्चन आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होते. अखिलेश यादव यांनी रिंकू आणि प्रिया यांच्यासोबत फोटो काढत दोघांना लग्नासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.

आता जवळपास दीड वर्षानंतर दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या तयारीमुळे दोन्ही कुटुंबांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. दरम्यान, रिंकू सिंहच्या नेतृत्वाखाली मेरठ मेवरिक्सने यूपीटी20 लीग 2026चं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर दमदार कामगिरी केल्यानंतर आता रिंकूच्या आयुष्यातील हा खास क्षण चर्चेत आला आहे.

दरम्यान, रिंकू सिंहच्या वडिलांचं जून महिन्यामध्ये कॅन्सरने निधन झालं. याच काळात रिंकू आणि प्रिया सरोज यांच्या लग्नाची तारीख ठरलेली होती. मात्र वडिलांच्या निधनानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्न पुढे ढकलण्यात आलं होतं. रिंकू यांच्या वडिलांची आपल्या मुलाचं लग्न पाहण्याची इच्छा होती, मात्र दुर्दैवानं त्याआधीच त्यांचं निधन झालं.

रिंकू सिंह उत्तर प्रदेशातील अलीगडचा रहिवासी असून भारतीय क्रिकेट संघातील टी-20 क्रिकेटपटू म्हणून त्यांने आपली ओळख निर्माण केली आहे. तर प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या युवा खासदार आहेत. 2024 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील मछलीशहर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवत संसदेत प्रवेश केला. 4 डिसेंबरला होणाऱ्या या लग्नाला दोघांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील अनेक बड्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. क्रिकेट आणि राजकारणातील दोन्ही क्षेत्रातील लोकांचं लक्ष या विवाहाकडे लागलं आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा