0,0,0,0,0,0… क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला चमत्कार! जसप्रीत बुमराहने करून दाखवलं
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा टी20 सामना सुरू आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने कमाल केली आहे. त्याने या सामन्याची सुरूवात निर्धाव षटकाने केली आणि एक विक्रम नोंदवला आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने जागतिक क्रिकेटच्या इतिहासात एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बुमराहने आपल्या घातक आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारा जगातील नंबर 1 गोलंदाज बनण्याचा बहुमान मिळवला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामन्याचे पहिलेच षटक जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवले. या षटकात अफगाणिस्तानचा सलामीवीर आणि कर्णधार इब्राहिम झद्रान याला बुमराहच्या अचूक टप्पा, स्विंग आणि इन-स्विंग उसळीचा अजिबात सामना करता आला नाही.
पहिल्याच डावातील पहिल्या ओव्हरमध्ये इतिहास
जसप्रीत बुमराहनेषटक निर्धाव टाकले आणि एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. विशेष म्हणजे, बुमराहच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सामन्याच्या पहिल्या डावातील पहिलेच षटक निर्धाव टाकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यापूर्वी त्याने डावाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर (मधल्या किंवा डेथ ओव्हर्समध्ये) मेडन ओव्हर्स टाकल्या होत्या. या ऐतिहासिक निर्धाव षटकामुळे जसप्रीत बुमराहच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील एकूण मेडन ओव्हर्सची संख्या आता 13 वर पोहोचली आहे. यासह त्याने आयसीसीच्या पूर्ण सदस्य राष्ट्रांमध्ये झिम्बाब्वेच्या रिचर्ड नगारवा 12 मेडन ओव्हर्स टाकल्या होत्या. मात्र आता त्याला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
That’s how Jasprit Bumrah started proceedings tonight 🔥😎
Updates ▶️ https://t.co/96e4nhbYLf#TeamIndia | #AFGvIND | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/99r2AZOn7E
— BCCI (@BCCI) September 15, 2026
भुवनेश्वर कुमार पहिल्या षटकात किंग
भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये डावाचे पहिलेच षटक निर्धाव टाकण्याच्या बाबतीत अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा सहावेळा असा पराक्रम करून अजूनही पहिल्या स्थानावर आघाडीवर आहे. या यादीत अर्शदीप सिंगने दोन वेळा, तर हरभजन सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, दीपक चहर, मोहम्मद सिराज, आशिष नेहरा, प्रवीण कुमार आणि बरिंदर स्रान यांनी प्रत्येकी एक वेळा हा कारनामा केला आहे. आता या दिग्गजांच्या पंगतीत जसप्रीत बुमराहनेही आपले नाव नोंदवले आहे.
