AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : पावसाची दडीच पण आता तापमानही वाढणार, शेतकऱ्यांचं टेन्शन कोणी वाढवलं? पीके वाचवण्यासाठी आता…

Weather forecast news : विदर्भात पावसाने पुन्हा उघडीप दिली असून पुढील ५ ते ६ दिवस पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Rain Update : पावसाची दडीच पण आता तापमानही वाढणार, शेतकऱ्यांचं टेन्शन कोणी वाढवलं? पीके वाचवण्यासाठी आता...
Maharashtra rain forecastImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 15, 2026 | 8:55 PM
Share

महाराष्ट्रात सध्या काही भागात पाऊस थोडाफार कोसळतो आहे, विदर्भात मात्र पावसाने मोठी दडी मारल्याचे चित्र आहे. पिकं वाढीच्या अवस्थेत असताना पावसाने उघडीप दिल्याने विदर्भातील बळीराजासमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे राहिले आहे. नागपूर हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भात पुढील ५ ते ६ दिवस पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे आधीच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आता आणखी भर पडली आहे.

पुढील ५ ते ६ दिवस पावसाची शक्यता धूसर

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सध्या विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण नाही. त्यामुळे आगामी ५ ते ६ दिवसांत या भागात पावसाची शक्यता जवळपास नाहीच. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या स्थितीकडे बारकाईने लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सततच्या पावसाच्या अभावामुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत आहे. हा ओलावा असाच कमी होत राहिल्यास पिकांना पाण्याची तीव्र टंचाई भासू शकते, ज्यामुळे उत्पादनावर थेट परिणाम होण्याची भीती कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

तापमानाचा पारा वाढणार, पिकांवर दुहेरी संकट

एकिकडे पावसाने पाठ फिरवली असतानाच, दुसरीकडे मात्र तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भात येत्या काही दिवसांत कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. कडक ऊन आणि पावसाची दडी यामुळे पिकांवरील पाण्याचा ताण लक्षणीयरीत्या वाढू शकतो. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि पिके कोमेजून जाण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे पुढील आठवडाभर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मोठी कसोटी पाहणारा ठरणार आहे.

२० टक्के तूट आणि एल निनोचा प्रभाव

यंदाच्या पावसाळ्यात विदर्भात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत तब्बल २० टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिना अर्धा संपत आला तरी ही तूट भरून निघण्याची कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. यामागील मुख्य कारण म्हणजे ‘एल निनो’चा वाढता प्रभाव. नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांनी याविषयी स्पष्ट केले आहे की, “सध्या मान्सूनवर एल निनोचा स्पष्ट प्रभाव दिसून येत आहे. एल निनो सक्रिय झाल्यामुळेच पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.” यामुळेच सप्टेंबरमधील पाऊसही निराशा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शक्य असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सहाय्याने पिकांना जगवण्याची वेळ आली आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा