Sanjay Raut : बंडखोरीची दहा कारणं…. मुख्य कारण मी सांगतो! नाशिकच्या शिवसेना मेळाव्यात संजय राऊतांची फटकेबाजी

| Updated on: Jul 09, 2022 | 1:41 PM

बंडखोरांनी कितीही कारणं सांगितली तरी मुख्य कारण मी सांगतो. बंडखोरांनी दिलेली कारण खोटी आहेत. बकवास आहेत. त्यांची कारण वेगळी आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : बंडखोरीची दहा कारणं.... मुख्य कारण मी सांगतो! नाशिकच्या शिवसेना मेळाव्यात संजय राऊतांची फटकेबाजी
Follow us on

नाशिकः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटात गेलेले आमदार प्रत्येक वेळी बंडखोरीचं वेगळं कारण देत आहेत. यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटातील आमदारांवर सणकून टीका केली. बंडखोरांनी (Rebel MLA) दहा दिवसांची दहा कारणं सांगितली. पण मुख्य कारण मी सांगतो, असं संजय राऊत म्हणाले. शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेने पक्ष संघटनासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. राज्यभरात शिवसैनिकांचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. संजय राऊत हे मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये आहेत. काल ग्रामीण भागातील शिवसैनिकांच्या त्यांनी भेटी गाठी घेतल्या. तर आज नाशिक शहरातील शिवसैनिकांसाठी भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. नाशिकच्या शिवसेनेला कोणताही धोका नाही, इथला पक्ष मजबूत स्थितीत आहे, असं सांगतानाच संजय राऊतांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

बंडखोरांनी दिलेली दहा कारणं…

बंडखोरांनी शिवसेना सोडल्याची अनेक कारणं सांगितली, यावरून संजय राऊतांनी नाशिकच्या मेळाव्यात तुफान फटकेबाजी केली. ते म्हणाले, ‘ जेव्हा गेले तेव्हा पहिल्या दिवशी सांगितलं आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणून बाहेर पडलो. दुसरा दिवस राष्ट्रवादीचे लोक निधी देत नव्हते म्हणून बाहेर पडलो. मग तिसरा दिवस. आम्हाला उद्धव ठाकरे भेटीला वेळ देत नव्हते म्हणून बाहेर पडलो. मग चौथ्या दिवशी आदित्य ठाकरे जास्त ढवळाढवळ करतात म्हणून बाहेर पडलो. पाचवा दिवस विठ्ठला भोवती बडवे जात झाले आहेत, म्हणून आम्ही सर्व भडवे बाहेर पडलो. सहावा दिवस. संजय राऊतांमुळे बाहेर पडलो. बरं का. सातव्या दिवशी परत सांगतात शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे म्हणून बाहेर पडलो. मी म्हणालो एकदा बसा सगळे. बसा. असा मानसिक गोंधळ करू नका. आणि ठरवा का बाहेर पडलो. कशा करता बाहेर पडतो. या महाराष्ट्रात डोंगर झाडी हॉटेल नाही का. काल मी येत होतो इगतपुरीवरून येत होतो. पाऊस पडत होता. मलाही वाटलं काय झाडी काय डोंगार नाशिकला आल्यावर बघतो तर एकदम ओक्के. आपले लोकं ओक्के. कारण काय तुम्हाला. आता दहावं कारण फार महत्त्वाचं आहे. बंडखोरांच्या गटात चिमणराव आबा पाटील नावाचा आमदार आहे. साधा माणूस आहे. त्यांनी काय सांगितलं. मी शिवसेनेतून का बाहेर पडलो तर गुलाबराव पाटलांना कंटाळून बाहेर पडलो. हे दहावं कारण आहे. गुलाबरावांना वैतागून सेना सोडली. पण इथे आलो तर ते इथे आले… असं संजय राऊत म्हणाले.

मुख्य कारण मी सांगतो…

बंडखोरांनी कितीही कारणं सांगितली तरी मुख्य कारण मी सांगतो, असं संजय राऊत म्हणाले. बंडखोरांनी दिलेली कारण खोटी आहेत. बकवास आहेत. त्यांची कारण वेगळी आहेत. मुख्य कारण आहेच खोकेबाजी. त्यांच्या खोकेबाजीला ठोकेबाजीने उत्तर दिलं पाहिजे. शिवसेना आमच्याच बापाची आहे. 50 खोके पचणार नाहीत. गुलाबरावांचा जुलाबराव होईल. पचणार नाही. थोड्याच दिवसात सर्वांना जुलाब सुरू होतील. शिवसेनेशी बेईमानी करणं सोपं काम नाही. ही ठाकऱ्यांची शिवसेना आहे, असा इशारा संजय राऊतांनी दिला.