AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल देशमुखांवर धाडी, एफआयआर वगैरे अतिरेक, दया, कुछ तो गडबड है…; संजय राऊतांनी उठवलं शंकेचं मोहोळ

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी करून गुन्हा दाखल केला आहे. (sanjay raut raise question on cbi raid on anil deshmukh home)

अनिल देशमुखांवर धाडी, एफआयआर वगैरे अतिरेक, दया, कुछ तो गडबड है...; संजय राऊतांनी उठवलं शंकेचं मोहोळ
संजय राऊत, शिवसेना खासदार
| Updated on: Apr 24, 2021 | 1:38 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी करून गुन्हा दाखल केला आहे. अचानक झालेल्या या धाडसत्रावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शंका उपस्थित करतानाच भाजपच्या दिशेने बोटही दाखवलं आहे. दया, कुछ तो गडबड है, असं म्हणत संजय राऊत यांनी देशमुखांवरील कारवाईवरच शंका निर्माण केली आहे. (sanjay raut raise question on cbi raid on anil deshmukh home)

संजय राऊत यांनी ट्विट करत ही शंका उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते शिवाजी साटम यांचा ‘दया, कुछ तो गडबड है’, हा संवाद वापरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कुछ तो गडबड है… माननीय उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुखांवर धाडी. एफ.आय. आर. वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया.. कुछ तो गडबड जरूर है, असं म्हणत राऊत यांनी शंकेचं मोहोळ उठवलं आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही

दरम्यान, देशमुख यांच्या घरावर छापेमारी झाल्यानंतर राऊत मीडियासमोर आले होते. यावेळी त्यांनी सीबीआयचा एक अजेंडा आहे. कोर्टाची ऑर्डर आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही. देशमुखांनी त्यांचं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू, असं म्हणाले होते. सीबीआय त्यांचं काम करत आहे. कोर्टाने आपलं काम केलं आहे. महाविकास आघाडी सरकारही आपलं काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.

दहा ठिकाणी छापेमारी

दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

एफआयआर दाखल

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (sanjay raut raise question on cbi raid on anil deshmukh home)

संबंधित बातम्या:

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल; घर, कार्यालयासह 10 ठिकाणी सीबीआयची छापेमारी

अनिल देशमुखांवर कारवाई ही सोची समझी चाल; हसन मुश्रीफांची टीका

अनिल देशमुखांच्या घरी पीपीई किट घालून झाडाझडती; काळी बॅग आणि पिवळ्या पिशव्यांमध्ये नेमकं काय?

(sanjay raut raise question on cbi raid on anil deshmukh home)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.