Ashish Shelar : संजय राऊतांनी गजनी सिनेमा बघावा, त्यांच्या काळात किती मंत्री होते त्यांना आठवेना, आशिष शेलारांचा टोला

संजय राऊत एवढ्या वरती थांबले नाहीत, त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी ही मागणी केली आहे, यावर आता भाजप नेत्यांच्या  तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत.

Ashish Shelar : संजय राऊतांनी गजनी सिनेमा बघावा, त्यांच्या काळात किती मंत्री होते त्यांना आठवेना, आशिष शेलारांचा टोला
आशिष शेलार, आमदार
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jul 16, 2022 | 10:55 PM

मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरुन (Cabinet Expansion) सध्या जोरदार राजकीय घमासान सुरू आहे. एकीकडून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सरकारच बेकायदेशीर (Cm Eknath Shinde) असल्याचे सांगत आहेत. तसेच त्यांनी घटनेचा दाखला देत दोन मंत्र्यांवर सरकार चालवता येत नाही. त्यासाठी किमान 12 मंत्र्यांची गरज आहे, असा दावा केला आहे, तसेच राज्यात हे नेमकं काय चाललेलं आहे? असा थेट सवाल राज्यपालांना केला आहे. संजय राऊत एवढ्या वरती थांबले नाहीत, त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी ही मागणी केली आहे, यावर आता भाजप नेत्यांच्या  तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. संजय राऊत यांनी घरी जाऊन गजनी पिक्चर बघावा असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

शेलार नेमंक काय म्हणाले?

यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, संजय राऊत हे फिल्म निर्माते असल्यामुळे त्यांना सल्ला आहे की आता घरी गेल्यावर त्यांनी रात्री नक्की गजनी हा सिनेमा बघावा. ज्या लोकांना विसरण्याची सवय असते, अशा सगळ्या पंडितांनी गजनी नक्की बघावा. त्यांचं स्वतःचं राज्य ज्यावेळेला होतं, महाविकास आघाडीचे सरकार होतं, त्यावेळेस किती मंत्री होते 32 दिवस, याचे उत्तर त्यांनी द्यावे याचा अर्थ त्यांचं सरकारच अनाधिकृत होतं का? असं म्हणता येईल का आणि म्हणून या सगळ्यातला संविधानिक स्पष्टता खूप गरजेची आहे,  ज्यामध्ये मर्यादा स्पष्ट केले आहेत, त्या छोट्या राज्यांसाठीचे आहेत, असेही शेलार म्हणाले आहेत.

बुद्धीभेद करु नका

त्यामुळे यामध्ये बेकायदेशीर असं काही नाही. राष्ट्रपती राजवटीचा तर प्रश्नच येत नाही, ही काय तुमच्या मालकीची खाजगी असलेली एखादी कंपनी नव्हे की तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्ही निर्णय घेतला. राऊत साहेब हे सरकार संविधानिक पद्धतीने चाललं आहे, राष्ट्रपती राजवटीचा विषयच येत नाही, काहीही विषय नसताना बुद्धिभेद करून. आपण अशा वार्ता करू नका अस आमचा तुम्हाला सल्ला आहे, असा सणसणीत टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांची मागणी काय?

संजय राऊत यांच्याकडून घटनेचा दाखला