औरंगाबादकर, चंद्रकांत खैरेंना काहीही माहित नसतं, ते उगाच ढगात गोळ्या मारत असतात- शहाजी बापू पाटील

| Updated on: Aug 30, 2022 | 2:23 PM

Shahaji Bapu Patil: चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे यांच्यातील शाब्दिक युद्ध अजून निवळलेलं नाही तोवरच आता असतानाच शहाजी बापू पाटील यांनीही खैरेंवर टीकास्त्र डागलंय.

औरंगाबादकर, चंद्रकांत खैरेंना काहीही माहित नसतं, ते उगाच ढगात गोळ्या मारत असतात- शहाजी बापू पाटील
Follow us on

मुंबई : सध्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Kahire) आणि शिंदे गटातली आमदारांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. चंद्रकांत खैरे आणि संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्यातील शाब्दिक युद्ध अजून निवळलेलं नाही तोवरच आता असतानाच शहाजी बापू पाटील यांनीही खैरेंवर टीकास्त्र डागलंय. चंद्रकांत खैरे उगाच ढगात गोळ्या मारत असतात, असं शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) म्हणाले आहेत. “दोन महिने झाले, आमचं सरकार राज्यात सत्तेत आलंय. काही राजकीय घटना घडल्या. त्यामुळे हे सरकार बनलं. आमचं सध्या चांगलं चालू आहे. दोन महिन्यात सरकारचा कारभार चांगला चाललाय”, असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे शहाजीबापूंच्या या विधानाला चंद्रकांत खैरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असेल.

चंद्रकांत खैरे औरंगाबादला राहतात त्यांना गोष्टी माहित नसतात. अन् ते उगाच ढगात गोळया मारत असतात, असं शहाजी बापू म्हणाले आहेत.

खैरे आणि भुमरे यांच्यातील वाद

चंद्रकांत खैरे यांनी मंत्री संदिपान भुमरे यांना गावठी मंत्री म्हणत हिणवलं. त्यावर होय मी आहेच गावठी, असं म्हणत भुमरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. आता या वादात शहाजीबापू पाटील यांनी उडी घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत त्यामुळे संदीपान भुमरे काहीही बोलत असतात, असं म्हणत त्यांनी संदिपान भुमरेंवर टीका केली आहे.“उद्धव ठाकरेंचे 2 समर्थक आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे गटात सामील होतील”, असा दावा संदिपान भुमरे यांनी केला होता. त्यावर खैरेंनी उत्तर दिलं. “आमच्याकडचं कुणीही शिंदेगटात जाणार नाही. पण उलट यांचे 40 आमदार आम्हाला फोन करत आहेत. शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आम चं चुकलं!, असं म्हणतात. मी त्यांना म्हटलं की या मग परत उद्धव साहेबांकडं… त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत”, असं विश्वास खैंरेंनी म्हटलं. त्याला आता भुमरेंनी प्रत्युत्तर दिलं. त्यावर आता शहाजीबापूंनीही त्यावर भाष्य केलंय.  खैरे ढगात गोळया मारत असतात, असं ते म्हणाले आहेत.

दसरा मेळावा वातावरण दिसुन आलं नाही,मेळावा जवळ आल्यावर मुख्यमंत्री काय धोरण घेतात यावर आहे,मुख्यमंत्री उपस्थितीतच मेळावा व्हावा अशी आमची इच्छा आहे, असंही शहाजी बापू म्हणालेत.