उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार, ‘जाणता राजा’ वादावरुन पवार राजेंना उत्तर देणार?

| Updated on: Jan 15, 2020 | 10:59 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले (Sharad Pawar Udayanraje Bhonsle) यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन, शरद पवारांवर निशाणा साधला होता.

उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार, जाणता राजा वादावरुन पवार राजेंना उत्तर देणार?
Follow us on

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आहेत. भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले (Sharad Pawar Udayanraje Bhonsle) यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन, शरद पवारांवर निशाणा साधला होता. त्याला आज शरद पवार (Sharad Pawar Udayanraje Bhonsle उत्तर देणार का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पडळ येथील साखर कारखान्याच्या साखर पोत्यांचं पूजन, शरद पवारांच्या हस्ते होणार आहे. खटाव – माण तालुका ऍग्रो साखर कारखान्याच्या  251000 व्या साखर पोत्यांचे पूजन पवार करणार आहेत.  यासाठी शरद पवार साताऱ्यात आहेत.

दरम्यान शरद पवारांना जाणता राजा ही पदवी कुणी दिली असा अप्रत्यक्ष सवाल भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन देशभरात वाद निर्माण झाल्यानंतर, उदयनराजेंनी थेट शरद पवार आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांना लक्ष्य केलं होतं.  या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. तसंच शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो खाली का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला होता.

उदयनराजेंच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं होतं. “होय शरद पवार हेच जाणता राजा. महाराष्ट्रात सर्व प्रश्नांची जाणीव त्यांना आहे, म्हणून अनेकजण त्यांचं बोट हातात घेऊन राजकारण करतो”, असं म्हणत आव्हाडांनी उदयनराजेंना टोला लगावला. तसंच कुणाच्या घरात मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर काय एनओसी साताऱ्यातून मागवायची का? शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवलं जातं”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

एकीकडे उदयनराजेंची टीका आणि छत्रपती शिवरायांबाबतचं पुस्तक वाद या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या  

जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय, उदयनराजेंचा हल्लाबोल, पवार, ठाकरेंवर घणाघात   

…तर शरद पवारांबाबतचे ‘जाणता राजा’ हे शब्दही काढायला हवेत : मुनगंटीवार