AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात दीड महिन्यात शरद पवार – नितीन गडकरी यांची दुसरी भेट; ४० मिनिटांच्या भेटीत या विषयांवर झाली चर्चा

चर्चेचा विषय ऊसशेती, शेतकरी आणि साखर कारखानदारी असला, तरी राजकारणातले दोन दिग्गज नेते भेटल्यावर राजकीय चर्चा तर होणारचं. दोन्ही नेत्यांमध्ये आज जवळपास ४० मिनिटे चर्चा झालीय.

नागपुरात दीड महिन्यात शरद पवार - नितीन गडकरी यांची दुसरी भेट; ४० मिनिटांच्या भेटीत या विषयांवर झाली चर्चा
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 01, 2023 | 4:42 PM
Share

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नागपुरात नितीन गडकरींच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट झाली. गेल्या दीड महिन्यात नागपुरात शरद पवार आणि नितीन गडकरी यांची ही दुसरी भेट आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये ऊसशेती, साखर कारखानदारी आणि शेतकरी या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे. पण या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा राजकीय अर्थही काढला जातोय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दीड महिन्यात दुसऱ्यांना नागपूरच्या दौऱ्यावर आले. या दोन्ही दौऱ्यात शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. आज शरद पवार नितीन गडकरी यांच्या घरी गेले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली.

४० मिनिटे झाली दोन मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा

चर्चेचा विषय ऊसशेती, शेतकरी आणि साखर कारखानदारी असला, तरी राजकारणातले दोन दिग्गज नेते भेटल्यावर राजकीय चर्चा तर होणारचं. दोन्ही नेत्यांमध्ये आज जवळपास ४० मिनिटे चर्चा झालीय. यापूर्वी १२ फेब्रुवारीला शरद पवार नागपूर आणि वर्ध्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळीही परत जाताना विमानतळावर शरद पवार आणि नितीन गडकरी यांची भेट झाली.

साखर कारखानदारीबद्दल कामाचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत, शरद पवार भाजपच्या अनेक नेत्यांवर टीका करतात. पण असं असलं तरीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक करण्याची एकही संधी शरद पवार सोडत नाही. नितीन गडकरी यांनी विदर्भात ऊसशेती आणि साखर कारखानदारीबाबत केलेल्या कामाचं शरद पवार नेहमी कौतुक करतात.

त्यांच्या इतर कामांचही ते कौतुक करतात. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये दीड महिन्यातल्या आजच्या दुसऱ्या भेटीवरून राजकीय चर्चा सुरू झाली. देशाच्या राजकारण शरद पवार एकीकडे मोदी सरकार विरोधात विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी दिल्लीत बैठकाही घेत आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकारचे वरिष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक आणि भेटीगाठींचेही सत्र सुरु आहे.

भेटीला राजकीय महत्त्व

शरद पवार यांचे राजकारण अवघ्या देशाला माहीत आहेत. ते राजकारणात सर्व पर्याय खुले ठेवत असल्याचं जाणकार सांगतात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने न मागता भाजपला पाठिंबा दिला होता. २०१९ लाही फडणवीस सोडून इतर कुणीही चालेल असा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. त्यामुळे आज शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या भेटीत शेती विषयावर चर्चा झाली असली, तरिही या भेटीला राजकीय महत्त्वही मोठं आहे.

Follow Us
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई