Sharad Pawar: तर मी त्यांना शाबासकी दिली असती, शरद पवारांनी फडणवीसांचं पुन्हा येणं उडवून लावलं

फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारली असे वाटत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरही ते दिसत होते. ते स्वयंसेवक आहेत, आदेश आल्यावर तो पाळायचा असतो. हे त्यांचे संघाचे संस्कार आहेत. त्यामुळे त्यांनी हे स्वीकारले असेल असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar: तर मी त्यांना शाबासकी दिली असती, शरद पवारांनी फडणवीसांचं पुन्हा येणं उडवून लावलं
देवेंद्र फडणवीस, शरद पवार
वनिता कांबळे

|

Jun 30, 2022 | 9:04 PM

मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तरी चर्चेत राहिले ते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis). सत्तेपासून दूर राहण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, अखेरीस पक्षाचा आदेश आला आणि देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री विराजमान होण्यास तयार झाले. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांनी देखील भाष्य केले आहे. उप मुख्यमंत्री पद( Deputy Chief Minister) फडणवीस यांनी काही आनंदाने स्वीकारले नाही असं म्हणत शरद पवारांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. तर फडणवीसांचं पुन्हा येणं उडवून लावलं आहे.

फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारली

फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारली असे वाटत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरही ते दिसत होते. ते स्वयंसेवक आहेत, आदेश आल्यावर तो पाळायचा असतो. हे त्यांचे संघाचे संस्कार आहेत. त्यामुळे त्यांनी हे स्वीकारले असेल असं शरद पवार म्हणाले.

पुन्हा येईल हे देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध करुन दाखवले आहे

हे सरकार कसं स्थापन झालयं हे सर्वांनाच माहित आहे. फडणवीस जनतेतून निवडणुक लढवून, लोकांचा विश्वास मिळवून. स्वच्छ बहुमत मिळवून निवडून आले असते तर मी फडणवीस यांना शाबासकी दिली असती असं पवार म्हणाले.

मुख्यमंत्री पद मिळेल याची कल्पना एकनाथ शिंदेना नसावी

राज्यात नेतृत्व बदलाची बंडखोरांची मागणी असावी, आणि त्या बदल्यात कुणाला तरी काम करण्याची संधी मिळावी. जे आसाममध्ये गेले होते, त्यांची अपेक्षा उपमुख्यमंत्रीपदापेक्षा जास्त होती असे वाटत नाही. भाजपात जर आदेश आला दिल्ली किंवा नागपूरहून, तर त्या आदेशामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी शिंदेंना देण्यात आली. याची कल्पना शिंदेंनाही नसावी. दुसरं आश्चर्य हे की, आदेश दिल्यानंतर तो आदेश तंतोतंत पाळावा लागतो. याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फणवीस. पक्षाच्या आदेश असल्यामुळेच फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. देवेंद्र फणवीस उप मुख्यमंत्री विराज होणे हा आश्चर्याचा धक्का होता असेही पवार म्हणाले.

पक्षाच्या आदेशाचे पालन

शिवसेना आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या सत्ता संघर्षाचा शेवट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होतील अशी घोषणा देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केली . तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. मात्र, मी कोणतेही मंत्रीपद घेणार नाही. मी सत्तेतच्या बाहेर असेल. पण सरकार चालेल ही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचं आणि बाळसााहेबांनी मांडलेलं हिंदुत्व. भाजप हिंदुत्व मांडतय. मोदींनी जे व्हिजन दाखवलं ते पुढे नेणार. काम करेल, असं फडणवीस यांनी जाहीर केलं. मात्र, यानंतर भाजप पक्षाने त्यांना उप मुख्यमंत्री विराजमान होण्याची विनंती केली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें