AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रकांत पाटलांच्या छातीवर शिवसेनेचा धनुष्यबाण!

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण स्वतःच्या छातीवर लावून घेतले. मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोहोचविण्यासाठी युतीच्या नेत्यांनी हा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच भाजपचे दिग्गज नेते असलेले चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या खिशावर धनुष्यबाण हे चिन्ह लावून घेतले. ज्या ठिकाणी युतीच्या […]

चंद्रकांत पाटलांच्या छातीवर शिवसेनेचा धनुष्यबाण!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण स्वतःच्या छातीवर लावून घेतले.

मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोहोचविण्यासाठी युतीच्या नेत्यांनी हा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच भाजपचे दिग्गज नेते असलेले चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या खिशावर धनुष्यबाण हे चिन्ह लावून घेतले. ज्या ठिकाणी युतीच्या उमेदवाराचे धनुष्यबाण हे चिन्ह असेल त्याठिकाणी सगळे नेते धनुष्यबाण खिशावर लावणार आहेत. तर ज्या ठिकाणी कमळ हे चिन्ह असेल त्याठिकाणी दोन्ही पक्षाचे नेते आपल्या खिशावर कमळाचे चिन्ह लावणार आहेत.

आपल्या उमेदवारांचे चिन्ह लोकांमध्ये बिंबवण्यासाठी युतीच्या नेत्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. त्याची सुरुवात चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले मतदारसंघ हे दोन्ही शिवसेनेच्या वाट्याचे आहेत. कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक तर हातकणंगलेत धैर्यशील माने हे युतीचे उमेदवार आहेत. संजय मंडलिक यांच्यासमोर राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक तर धैर्यशील माने यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचं आव्हान आहे.

सध्या जिल्हाभर चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसेना नेते युतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. शिवसेनेसह भाजपचे नेतेही छातीवर सेनेचा धनुष्य लावून प्रचार करताना पाहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या 

लोकसभा निवडणूक : शिवसेनेची यादी जाहीर 

आघाडीचे 48 पैकी 36 जागांवर उमेदवार जाहीर, संपूर्ण यादी एकाच ठिकाणी  

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...