बाळासाहेबांचे आवडते थापा, शिंदे गटात का गेले? यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Sep 26, 2022 | 8:26 PM

त्याच्यावर काय अन्याय होता. त्याला काय राजकीय अभिलाषा होती का? बाळासाहेबांनी मुलासारखी सांभाळलेली ही माणसे आहेत.

बाळासाहेबांचे आवडते थापा, शिंदे गटात का गेले? यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. बाळासाहेबांची(Balasaheb Thackeray) सावली अशी ओळख असलेल्या चंपासिंह थापा(Champa Singh Thapa ) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

थापाचे मातोश्रीवर काही काम राहिलं नाही. तो बाळासाहेबांचा सेवक होता. तो गेला, का गेला? मला माहित नाही त्याला कोणी बोलवून घेतलं माहित नाही असं सावंत म्हणाले.

त्याच्यावर काय अन्याय होता. त्याला काय राजकीय अभिलाषा होती का? बाळासाहेबांनी मुलासारखी सांभाळलेली ही माणसे आहेत.
शिवसेनेतल्या अनेकांना फोन येत आहेत पैसे देतो या. विशेषत: शाखाप्रमुखांना अशा प्रकारच्या ऑफर दिल्या जात असल्याचा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.

अदृश्य नेत्यांनी सांगितल असणार तुम्ही कोर्टात जाऊ नका म्हणून शिंदे गटाचे कुणी कोर्टात हजर राहत नाही असा टोला सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवरुन लगावला आहे.

गुवाहाटी सुरत गोव्याचा खर्च तुम्ही कुठून केला ते सांगा. स्वतः नरकात बुडायचं आणि दुसऱ्यांकडे बोटं दाखवायची हे किळसवाण राजकारण महाराष्ट्रात कधी झालं नाही.

राम कदम यांच्या नावात राम आहे, ते शिल्लक आहे की नाही माहित नाही. बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला झाला ? हा हल्ला नव्हता
गदारांसाठी काय हार तुरे घेऊन जायचं का? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.