AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना नगरसेवकाचा पक्षाला रामराम, राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेप्रवेश

मनसेकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून दिलीप दातार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून तिकीट मिळण्याची आशा संपल्याने दातार यांनी पक्षांतर केल्याचं बोललं जात आहे

शिवसेना नगरसेवकाचा पक्षाला रामराम, राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेप्रवेश
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Sep 30, 2019 | 10:11 AM
Share

नाशिक : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विरोधीपक्षातील दिग्गज नेत्यांनीही पक्षाची साथ सोडून सत्ताधाऱ्यांचा झेंडा हाती घेतला होता. मात्र नाशकात उलटी गंगा वाहताना दिसत आहे. शिवसेना नगरसेवक दिलीप दातार आज मनसेमध्ये प्रवेश (Shivsena Corporator in MNS) करणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दातार मनसेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. दिलीप दातार नाशिक महापालिकेत शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. मात्र त्यांनी कालच नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

मनसेकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून दिलीप दातार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून तिकीट मिळण्याची आशा संपल्याने दातार यांनी पक्षांतर (Shivsena Corporator in MNS) केल्याचं बोललं जात आहे. युती झाल्यास नाशिक पश्चिमची जागा शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे आणि तिथून कोणाला उमेदवारी मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

नाशिकवर राज ठाकरे यांची मजबूत पकड आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा करिष्मा चालला होता. नाशिक शहरातील तिन्ही जागा मनसेने पटकावल्या होत्या. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघही त्यापैकीच एक होता.

मनसे विधानसभा स्वबळावर लढणार? पुण्यात बैठक सुरु

पहिल्या फटक्यात मनसेचे नितीन भोसले आमदार झाले. पाच वर्षांच्या कालावधीत मनसेला मिळालेला जनाधार टिकवता आला नाही. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजप नगरसेविका सीमा हिरे आमदारपदी निवडून आल्या.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक पश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक एक लाख 4 हजार मतं मिळाली होती. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे.

मनसेकडून माजी गटनेते सलीम शेख किवा शहराध्यक्ष अनिल मटाले निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता होती. परंतु दातारांनी (Shivsena Corporator in MNS) सेनेची साथ सोडत इंजिन जवळ केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमधून स्वगृही परतलेले माजी आमदार अपूर्व हिरे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असतील की जुने नेते नाना महाले यांना संधी मिळणार? हा प्रश्न आहे.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सातपूर आणि अंबड या दोन औद्योगिक वसाहतींचा भाग मोडतो. कामगार वर्गाची वस्ती या भागाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. माकपकडून कामगार नेते डॉ. डी. एल. कराड हे पुन्हा नशीब अजमावणार का? याकडेही कामगार विश्वाच लक्ष लागलं आहे.

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-कारची धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-कारची धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू

FIFA World Cup 2026 Prize Money : फायनल हरणाऱ्या अर्जेंटिनाला 318 कोटींचं बक्षीस, चँपियन स्पेनला मिळालेली प्राईज मनी ऐकून डोळेच विस्फारतील.

FIFA World Cup 2026 Prize Money : फायनल हरणाऱ्या अर्जेंटिनाला 318 कोटींचं बक्षीस, चँपियन स्पेनला मिळालेली प्राईज मनी ऐकून डोळेच विस्फारतील

सलमानच्या अवस्थेवर चाहत्यांकडून काळजी व्यक्त; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन.

सलमानच्या अवस्थेवर चाहत्यांकडून काळजी व्यक्त; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन

Rohit Sharma : रोहितने शतकी खेळी खेळून सर्वांची बोलती केली बंद, तरीही गिल हिटमॅनच्या रिटारयमेंटवर म्हणाला की….

Rohit Sharma : रोहितने शतकी खेळी खेळून सर्वांची बोलती केली बंद, तरीही गिल हिटमॅनच्या रिटारयमेंटवर म्हणाला की…

विश्वचषक अंतिम सामन्यानंतर भर मैदानात अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा राडा, थेट मारहाण, धक्कादायक व्हिडीओ...

विश्वचषक अंतिम सामन्यानंतर भर मैदानात अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा राडा, थेट मारहाण, धक्कादायक व्हिडीओ..

Lionel Messi Crying : फायनलमध्ये स्पेनकडून पराभव झाल्यानंतर लियोनेल मेसीच्या अश्रूचा बांध फुटला, VIDEO.

Lionel Messi Crying : फायनलमध्ये स्पेनकडून पराभव झाल्यानंतर लियोनेल मेसीच्या अश्रूचा बांध फुटला, VIDEO