मनसे विधानसभा स्वबळावर लढणार? पुण्यात बैठक सुरु

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली आहे. ते आजपासून 3 दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या काळात ते पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आपली रणनीति ठरवतील. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यताही यावेळी तपासली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे राज्याभरातील जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका […]

मनसे विधानसभा स्वबळावर लढणार? पुण्यात बैठक सुरु
Follow us
| Updated on: Jun 02, 2019 | 10:47 AM

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षाच्या बांधणीला सुरुवात केली आहे. ते आजपासून 3 दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या काळात ते पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आपली रणनीति ठरवतील. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यताही यावेळी तपासली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरे राज्याभरातील जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. याची सुरुवात पुण्यापासून झाली आहे. त्यामुळे मनसे आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार की आघाडीसोबत हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्ष बांधणीसाठीच्या बैठकांमध्ये मनसेच्या राज्यभरातील ताकदीचाही अंदाज घेतला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपविराधातील झंझावाती प्रचार आणि तरीही भाजपला मिळालेले पूर्ण बहुमत याचाही विचार होईल, असे सांगितले जात आहे. त्याचा विचार करुनच भविष्यातील रणनीती ठरणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोबाईल घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे. सर्वांचे मोबाईल क्लब हाऊसच्या गेटवरच जमा केले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या विषयांवर गुप्त चर्चा होणार हे स्पष्ट होत आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.