AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasaheb Thackeray Memorial | भूमिपूजन सोहळ्याचे छापील आमंत्रण कोणालाही नाही, आम्हीही हा कार्यक्रम ऑनलाईन बघणार : अनिल परब

हे स्मारक म्हणजे आमच्यासाठी स्मृतिस्थान आहे आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे, असेही अनिल परब म्हणाले. (Anil Parab On Balasaheb Thackeray Memorial)

Balasaheb Thackeray Memorial | भूमिपूजन सोहळ्याचे छापील आमंत्रण कोणालाही नाही, आम्हीही हा कार्यक्रम ऑनलाईन बघणार : अनिल परब
अनिल परब, परिवहन मंत्री
| Updated on: Mar 31, 2021 | 12:38 PM
Share

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला कुणाला आमंत्रण आहे की नाही, हे मला माहिती नाही. आम्हीही हा कार्यक्रम ऑनलाईन बघणार आहोत, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरुन शिवसेनेवर टीका केली जात आहे. यावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Anil Parab On Balasaheb Thackeray Memorial Bhumi Pujan Ceremony Invitation)

हे स्मारक नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान

शिवसैनिकांसाठी शिवजयंती म्हणजे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पुजाच आहे. त्यासोबतच आमचे दुसरे दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं ही आज भूमिपूजन होत आहे. त्यामुळे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बाळासाहेबांच्या या वास्तूमुळे त्यांचा संपूर्ण इतिहास महाराष्ट्राच्या जनतेलाही कळणार आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बाळासाहेबांचे भव्य स्मारक होऊ घातलं आहे. हे स्मारक म्हणजे आमच्यासाठी स्मृतिस्थान आहे आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे, असेही अनिल परब म्हणाले.

कोण काय सांगते त्याला महत्त्व नाही

“बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे कुणाला आमंत्रण आहे वा नाही हे माहीत नाही. पण हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. आम्ही देखील हा कार्यक्रम ऑनलाईनच बघणार आहोत. त्यामुळे कोण काय सांगते त्याला महत्त्व नाही. ज्यांना जे बोलायचे ते बोलू दे, माझ्यासारखा शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांनी घडला आहे. त्यामुळे कोण काय बोलतो त्याला आम्ही महत्त्व देत नाही,” असेही अनिल परब यांनी सांगितले. (Anil Parab On Balasaheb Thackeray Memorial Bhumi Pujan Ceremony Invitation)

छापील आमंत्रण कोणालाही नाही

“आजचा कार्यक्रम ऑनलाईन आहे. शिवसेनेच्या सर्व नेत्यांना मंत्र्यांना आमंत्रण दिलेले आहे. छापील आमंत्रण कोणालाही देण्यात आलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे,” असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले.

सुनियोजित आराखडा तयार केला जाणार

“बाळासाहेबांच्या स्मारकाचा आराखडा जनतेच्या समोर ठेवला जाईल. यावेळी बाळासाहेबांच्या विचारांच्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवल्या जातील. त्यानुसार सुनियोजित आराखडा तयार केला जाईल,” असेही ते म्हणाले.

आज भूमिपूजन

बाळासाहेबांच्या स्मारकाचं आज भूमिपूजन होणार आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दिवसभरातील कार्यक्रमाची माहिती दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यानंतर संध्याकाळी 5.00 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे.

दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थितीत राहणार आहेत (Anil Parab On Balasaheb Thackeray Memorial Bhumi Pujan Ceremony Invitation)

संबंधित बातम्या :

Balasaheb Thackeray Memorial | बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा, उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन

राज ठाकरेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, भूमिपूजन कोण करतं याला महत्त्व नाही; मनसेचा टोला

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...