AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मिस्टर फडणवीसांकडून खंडणीखोर सैतानाची तरफदारी’, दादरा नगर-हवेलीत संजय राऊतांचा पलटवार

महाराष्ट्रातील खंडणीखोर आणि वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? असा सवाल फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या टीकेला आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.

'मिस्टर फडणवीसांकडून खंडणीखोर सैतानाची तरफदारी', दादरा नगर-हवेलीत संजय राऊतांचा पलटवार
संजय राऊत, खासदार, शिवसेना
| Edited By: sagar joshi | Updated on: Oct 27, 2021 | 12:31 PM
Share

मुंबई : दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. शिवसेना विरुद्ध भाजप असं स्पष्ट चित्र इथे पाहायला मिळत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील खंडणीखोर आणि वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? असा सवाल फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या टीकेला आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. (Sanjay Raut’s reply to Opposition Leader Devendra Fadnavis’s criticism)

अशा प्रकारच्या निवडणुका भाजपनं लढवल्या नाहीत का? आम्हाला खंडणीखोर म्हणत असाल तर इथे भाजप प्रशासक खंडणीखोरीवर फडणवीस बोलत नाहीत? इथली जनता त्रस्त आहे. म्हणून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. मिस्टर फडणवीस खंडणीखोर सैतानाची तरफदारी करत आहेत, असा पलटवार संजय राऊत यांनी केलाय. फडणवीस यांना बोलायचे ते बोलू द्या. भाषणात ते टाळीची वाक्ये घेतात. पण काल इथे त्यांना टाळ्याही पडल्या नाहीत असं मला कळलं. फडणवीस यांना वाटत असेल की ते इथे आल्याने मराठी मतदान भाजपच्या पारड्यात पडेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. इथली मराठी जनता पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे, असा दावाही राऊतांनी केलाय.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विजयी सभेला येतील’

एक ज्येष्ठ खासदार आपलं जीवन संपवतो आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला वाटलं नाही की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी? महाराष्ट्र सरकार ती चौकशी करतेय पण केंद्र सरकारचीही जबाबदारी होती. भाजपचे अनेक लोक या प्रकरणाशी संबंधित कारण डेलकर यांच्या चिठ्ठीत अनेकांची नावे आहेत. इथल्या प्रशासकाचेही त्यात नाव आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे ही जागा जिंकतोय आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केलाय.

‘फडणवीसांसारख्या नेत्याचे अध:पतन बघवत नाही’

तपास यंत्रणांचा वापर हा केंद्राचा महाराष्ट्र सरकार विरोधातील कट आहे. स्वत: मुख्यमंत्रीही तेच सांगत आहेत. महाराष्ट्रात सरकार आले नाही याचा राग काढला जात आहे. महाराष्ट्राचा कणा ताठ आहे, कुणापुढेही झुकणार नाही, असंही राऊत म्हणाले. एनसीबीने अनेक प्रकरणे केली. रिया चक्रवर्ती प्रकरणात काय झाले? एक प्रकारे खंडणीखोरी आहे. अशा खंडणीखोरांसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते वकिली करतात हे दुर्दैव आहे. फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचे होत असलेलं अध:पतन मला बघवत नाही, असा टोलाही राऊतांनी लगावलाय.

देवेंद्र फडणवीस काय बोलतात यावर परसेप्शन ठरत नाही. आमच्या दलालीवर बोलतात, आम्ही तोंड उघडले तर दिल्लीतील, महाराष्ट्रातील 5 वर्षाची, गुजरातमधील 20 वर्षातील दलाली काय? याचा खरा अर्थ देशाला कळेल. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नयेत, असा इशाराही राऊत यांनी फडणवीसांना दिला आहे.

‘समीर वानखेडेंची चौकशी व्हायला हवी’

ज्याने पाप केले त्याला भरपाई करावी लागेल. नबाव मलिक ज्या गोष्टी समोर आणत आहेत त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. एनसीबी आणि वानखेडे प्रकरणात कठोर भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्राचा कणा ताठ आहे. तो केंद्र सरकारपुढे झुकणार नाही हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. समीर वानखेडे यांनी जे काही केलं त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही राऊत यांनी केलीय.

इतर बातम्या :

तर 15 कोटी मुस्लिमांना अशी नोकरी मिळेल काय? वानखेडे आरोपीच्या पिंजऱ्यात, नवाब मलिकांनी झोडपलं!

वानखेडेंचा दाढीवाला मित्र, तिघांचे CDR आणि CCTV फुटेज, नवाब मलिकांची अर्ध्या तासाची खळबळजनक पत्रकार परिषद

Sanjay Raut’s reply to Opposition Leader Devendra Fadnavis’s criticism

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक