Sanjay Nirupam : मालाडमध्ये राडा, संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप

Sanjay Nirupam : मालाड पूर्वेला दिंडोशी विधानसभा मतदारसंघात राडा झाला आहे. दिंडोशीतील एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांनी मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे.

Sanjay Nirupam : मालाडमध्ये राडा, संजय निरुपम यांचा मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप
संजय निरुपम आणि उद्धव ठाकरे
| Updated on: Nov 20, 2024 | 2:07 PM

मालाड पूर्वेला पठाण वाडीत शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. दिंडोशीतील एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते काही लोकांना जबरदस्तीने UBT शिवसेनेला मत देण्यासाठी घेऊन जात होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

“मी तिथे पोहोचलो तेव्हा मुस्लिम समाजातील UBT शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. जे निवडणूक आयोगाचे उल्लंघन आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस आले. मी त्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी कारवाई न केल्यास पोलिस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी करणार आहे.

संजय निरुपम यांच्यासमोर कोण?

उद्धव ठाकरे गटाचे सुनील प्रभू मागच्या दोन टर्मपासून इथून आमदार आहेत. आता त्यांना हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. संजय निरुपम यांच्यारुपाने सुनील प्रभू यांच्यासमोर कडवं आव्हान आहे. दिंडोशी विधानसभा मतदारसंघात उत्तर भारतीय, हिंदी भाषिकांचा प्रभाव आहे.