AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंजली दमानिया खडसेंविरोधातील पुरावे घेऊनच ईडीकडे; ‘त्या’ तासाभरात काय घडलं?

या भेटीदरम्यान ईडीकडून अंजली दमानिया यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. (Anjali Damania Comment After ED Inquiry)

अंजली दमानिया खडसेंविरोधातील पुरावे घेऊनच ईडीकडे; 'त्या' तासाभरात काय घडलं?
anjali damania
| Updated on: Jan 05, 2021 | 7:22 PM
Share

मुंबई : “मला ईडीचा समन्स आला होता, म्हणून मी आली होती. ईडीने मला माहिती विचारली ती मी दिली आहे. मला जर पुन्हा ईडीतर्फे बोलवलं गेलं, तर मला यावचं लागणार आहे,” अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली. (Anjali Damania Comment After ED Inquiry)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या चौकशीपूर्वी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) माहितीची जोरदार जमवाजमव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी अंजली दमानिया यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ईडीकडून अंजली दमानिया यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.

“मला ईडीचा समन्स आला होता. म्हणून मी आली होती. त्यांनी मला जी काही माहिती विचारली ती मी दिली. मला जर पुन्हा ईडीतर्फे बोलवलं गेलं तर मला यावचं लागणार आहे,” असे अंजली दमानिया म्हणाल्या.

“मला कुठल्याही राजकारणात पडायचं नाही. माझी जी कोर्टात याचिका होती त्यासंदर्भात मला ईडीने काही माहिती विचारली. ती माहिती मी ईडीला दिली आहे. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही,” असेही अंजली दमानिया यांनी सांगितले.

दमानियांचे खडसेंवर आरोप 

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी अंजली दमानिया यांनी आपल्याकडे एकनाथ खडसे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा दावाही केला होता. तत्पूर्वी अंजली दमानिया यांची राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषेदवर नियुक्ती करु नये, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रही लिहले होते. खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना वापरलेली भाषा या सर्व गोष्टींमुळे त्यांना आमदार करु नये, असे दमानिया यांनी पत्रात म्हटले होते.

ईडीच्या अधिकाऱ्यांचा खडसेंच्या वकिलांना फोन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) केस प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) अधिकाऱ्यांनी अ‌ॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे अधिकारी थोड्याच वेळात सरोदे यांच्या कार्यालयात पोहोचणार आहेत. एकनाथ खडसेंच्या केससंदर्भातील कागदपत्रांचा तपास करण्यासाठी ईडीकडून फोन आल्याची माहिती आहे.

अ‌ॅड. असीम सरोदे हे खडसेंचे वकील आहेत. असीम सरोदे यांच्याकडून दोन हजार पानांची माहिती ईडीला दिली जाण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांना ईडीकडून भोसरी जमीन प्रकरणी 30 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, एकनाथ खडसेंना कोरोना झाल्यामुळे ते ईडीसमोर हजर राहिले नव्हते. (Anjali Damania Comment After ED Inquiry)

संबंधित बातम्या : 

खडसेंच्या चौकशीपूर्वी ईडीकडून ‘जमावाजमव’; आता अंजली दमानियांकडूनही घेणार माहिती

इकडे खडसेंना नोटीस, तिकडे अंजली दमानिया ED आणि सीबीआयलाच कोर्टात खेचण्याच्या तयारीत

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.