AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल परबांमुळे एसटी कर्मचारी रस्त्यावर, एकही खासगी बस चालवून दाखवा, हाजी अराफात यांचं आव्हान

आजपासून खासगी बसेस आम्ही बंद करत आहोत. राज्यात खासगी युनिनयच्या बसेस बंद करणार. केवळ नॅशनल परमिट असलेल्या बसेस चालणार आहे. राज्यातील बसेस जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बंद राहणार, असा इशारा हाजी अराफात यांनी दिलाय. एकही खासगी बस राज्यात चालवू देणार नाही, असं आव्हानच हाजी अराफात यांनी दिलंय.

अनिल परबांमुळे एसटी कर्मचारी रस्त्यावर, एकही खासगी बस चालवून दाखवा, हाजी अराफात यांचं आव्हान
हाजी अराफात, अनिल परब
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 4:05 PM
Share

मुंबई : विलिनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा मागील आठवड्याभरापासून बेमुदत संप सुरु आहे. मुंबईतील आझाद मैदानावर शेकडो एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोतही एसटी कर्मचाऱ्यांसोबत ठाण मांडून आहेत. या पार्श्वभूमीवर हाजी अराफात यांनीही आता ठाकरे सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना आव्हान दिलंय. आजपासून भाजप नव भारतीय शिववाहतूक युनियन एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उतरणार असल्याची घोषणाच अराफात यांनी केलीय. (Private buses to be shut down, Haji Arafat challenges Anil Parab on the backdrop of ST workers’ agitation)

अनिल परब एसटी कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. मराठी भूमिपुत्रांना आंदोलन करावं लागत आहे. भाजप नव भारतीय शिववाहतूक युनियन या आंदोलनात उतरणार आहे. सात लाख बसेस आहेत. ही सगळ्यात मोठी संघटना आहे. आजपासून खासगी बसेस आम्ही बंद करत आहोत. राज्यात खासगी युनिनयच्या बसेस बंद करणार. केवळ नॅशनल परमिट असलेल्या बसेस चालणार आहे. राज्यातील खासगी बसेस जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बंद राहणार, असा इशारा हाजी अराफात यांनी दिलाय. एकही खासगी बस राज्यात चालवू देणार नाही, असं आव्हानच हाजी अराफात यांनी दिलंय.

पडळकर, खोतांच्या भूमिकेवर बोट परबांचं बोट

अनिल परब माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी पडळकर आणि खोत यांच्याशी दोन वेळा बोललो आहेत. त्यांच्यासमोर सरकारचे प्रस्ताव ठेवले आहेत. ते एसटी कर्मचाऱ्यांशी बोलून पुन्हा येतो म्हणून गेले आहेत. कदाचित कामगारांना समजावण्यात ते कमी पडले असतील. नाहीतर कामगार त्यांचं ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतील. मात्र, सर्वांसाठी चर्चेची दारं खुली आहेत. कुणीही आमच्याकडे चर्चेसाठी यावं, असं आवाहन परब यांनी केलंय.

दरम्यान, एसटी कमर्चाऱ्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची आज संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनाही बोलावल्याचं अनिल परब यांनी सांगितलं.

गोपीचंद पडळकरांचा पुन्हा घणाघात

राज्यातील महाविकास आघाडी सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं आहे. काळ्या पायाचं हे सरकार आहे. अनेक संकटाच्या काळात या सरकारने काहीही मदत केली नाही. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत त्या ऐकून घ्याव्या. त्यांना काय देता येईल, काय देता येणार नाही याबाबतही चर्चा करावी. अन्यथा हेच एसटी कर्मचारी तुमचं दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराच पडळकर यांनी ठाकरे सरकारला दिलाय.

इतर बातम्या :

Amravati Violence : पोलिसांच्या विनंतीनंतरही किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर ठाम, पोलीस काय कारवाई करणार?

ठाकरे सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन पडळकरांचा घणाघात

Private buses to be shut down, Haji Arafat challenges Anil Parab on the backdrop of ST workers’ agitation

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.