देशद्रोही सोमय्यांना जोडे मारा ! सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यांवरती जोरदार टीका

"विक्रांत युद्धनौका (INS Vikrant) वाचवण्यासाठी जमा केलेले 58 कोटी हडपल्याचे एक प्रकरण आता समोर आले आहे. देशातल्या लाखो लोकांनी किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya) महाराष्ट्र (Maharashtra) व डब्यांत पैसे टाकले. त्या लाखो लोकांची फसवणूक झाली. हा पैसा भाजपच्या तिजोरीत गेला नसेल तर मग कुठे पोहोचला ?

देशद्रोही सोमय्यांना जोडे मारा ! सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यांवरती जोरदार टीका
सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यांवरती जोरदार टीकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 7:17 AM

मुंबई –विक्रांत युद्धनौका (INS Vikrant) वाचवण्यासाठी जमा केलेले 58 कोटी हडपल्याचे एक प्रकरण आता समोर आले आहे. देशातल्या लाखो लोकांनी किरीट सोमय्यांची (Kirit Somaiya) महाराष्ट्र (Maharashtra) व डब्यांत पैसे टाकले. त्या लाखो लोकांची फसवणूक झाली. हा पैसा भाजपच्या तिजोरीत गेला नसेल तर मग कुठे पोहोचला ? किरीट सोमय्या व त्याच्या मुलाने सैनिकांचे बलिदान भरबाजारात लिलावात काढले. भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावून कमळाच्या साक्षीने त्यांनी त्यांनी हिंदुत्वाशी हा व्यभिचार केला आहे. कायद्याने कारवाई होईलच, पण अशा लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकायला हवा. जातील तिथे फाटक्या जोड्यांनी अशा देशद्रोही लोकांचे स्वागत करायला हवे. सैनिकांच्या बलिदानाचा, हिंदुस्थानी युध्दनौकेचा अपमान देश सहन करणार नाही,”अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्या यांच्यावरती करण्यात आली आहे.

भाजपच्या भ्रष्टाचाराची विक्रांत फाईल तपासायला हवी

देशात अण्णा हजारे किंवा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारे कोणी शिल्लक असतील, तर त्यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराची विक्रांत फाईल तपासायला हवी. बांग्लादेशच्या युद्धात भारताला विजय मिळवून देणाऱ्या या युद्धनौकेचेही भाजपचे महात्मा किरीट सोमय्या व त्यांच्या मुलाने कशा प्रकारे शोषण केले आहे ते बाहेर येईल. ज्यावेळी विक्रांत युद्धनौका हिंदुस्थानच्या नौदलातून निवृत्त व्हायची वेळ आली होती. त्यावेळी सैन्यदलासह देश सुध्दा हळहळला होता. त्यादरम्यान किरीट सोमय्या यांनी लोकवर्गणीतून युद्धनौकेसाठी आवश्यक असलेला निधी जमा करू असं जाहीर केलं. मुंबईसह महाराष्ट्रातून आणि व्यापाऱ्याकडून मोठा निधी जमा केला. जमा केलेल्या पैश्यांचं काय केलं असा प्रश्न देखील विचारण्यात आला आहे.

राजभवनाच्या खात्यात पैसे जमा न झाल्याचे राज्यपालांनी कळविले

जमा केलेला निधी राजभवनाच्या खात्यात जमा करणं आवश्यक होतं. पण डब्यांमधून जमा केलेला निधी गेला कुठे ? राजभवनाच्या खात्यात पैसे जमा न झाल्याचे राज्यपालांनी कळविले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी घोटाळा केल्याचे समोर आले आहे. किरीट सोमय्यांनी केलेला घोटाळा जाहीर असताना सुध्दा भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेते त्यांची पाठीराखण करीत असल्याचं दिसतं आहे. आता किरीट सोमय्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावणार काय असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

Aurangabad | राज्य सरकारच्या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान, काय आहे निवडणुकांविषयीची याचिका?

08 April 2022 Panchang | 08 एप्रिल 2022, शुक्रवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

Nagpur ZP | पंचायती राज समितीचा नागपूर दौरा; शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागातील अनियमिततेवर रोष

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.