St Workers Agitation LIVE Updates : एकीकडे सदावर्तेंना अटक, दुसरीकडे सोमय्यांना चौकशीसाठी समन्स!

| Updated on: Apr 08, 2022 | 10:52 PM

St Workers Agitation LIVE Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

St Workers Agitation LIVE Updates : एकीकडे सदावर्तेंना अटक, दुसरीकडे सोमय्यांना चौकशीसाठी समन्स!
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : एसटी संपाबाबत (St Workers Agitation) आज महत्त्वपूर्ण घडामोड घडली. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरावर शुक्रवारी दुपारी धडक दिली. यावेळी काही आंदोलकांनी चप्पल भिरकावल्या. काहींनी बांगड्या फोडल्या. जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं यावेळी पाहायला मिळाली. पोलीस आणि प्रशासनही यांचीही यावेळी धावपळ उडाली होती. शरद पवार यांच्यावर हल्लाबोल यावेळी आंदोलकांनी केला. गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेलं एसटी संपाचं आव्हान गुरुवारी न्यायालयानं (High Court) दिलेल्या निर्णयानंतर आता संपुष्टात येईल, अशी शक्यता वाटत होती. गुरुवारी याच अनुशंगानं आझाज मैदानात आंदोलकांकडून जल्लोषही करण्यात आला होता. त्यानंतर अचानक शुक्रवारी दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत सिल्वर ओक गाठल्यानं पुन्हा एकदा एसटी संप चिघळला आहे. विलीनकराच्या प्रमुख मागणीवर संपकरी एसटी कर्मचारी अजूनही कायम असल्याचं यावेळी आंदोलनकरांनी ठणकावून सांगितलंय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Apr 2022 10:18 PM (IST)

    किरीट सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांचं समन्स

    किरीट सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांचं समन्स

    किरीट सोमय्यांना उद्या चौकशीसाठी बोलावलं

    INS विक्रांत घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं

  • 08 Apr 2022 09:41 PM (IST)

    इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया

    हल्ल्याचं मी समर्थन करत नाही

    पण हल्ला का झाला याचा विचार केला पाहिजे

    ही वेळ का आली याचा विचार केला पाहिजे

    पाच महिने कर्मचारी आंदोलन करत होते त्यांचा कुणी विचार केला नाही

    गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे आहे, हल्ला होत असताना पोलीस काय करत होते

    इम्तियाज जलील यांचा सवाल

    केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे

    शाहीन बाग आंदोलन, किसान आंदोलन झालं, तसं एसटी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं

  • 08 Apr 2022 08:30 PM (IST)

    सोलापुरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

    - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ॲड. सदावर्ते आणि भाजपच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

    - एकीकडे रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन सुरु असताना अचानक आलेल्या कार्यकर्त्यानी जाळला प्रतिकात्मक पुतळा

    - रुपाली चाकणकरांच्या उपस्थित असलेल्या आंदोलनातही फडणवीस यांच्याविरोधी घोषणा

    - सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झाले आंदोलन

  • 08 Apr 2022 08:06 PM (IST)

    शरद पवार यांच्या घरावरील आंदोलनाचा औरंगाबादेत निषेध

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने औरंगाबाद शहरात निषेध

    औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात अनेक कार्यकर्ते सहभागी

  • 08 Apr 2022 06:52 PM (IST)

    परिवहन मंत्री अनिल परब Live

    न्यायालयाचा आदर राखत कामावर हजर राहवे

    एसटी नियमीत सुरू करावी

    आंदोलनात जे होते त्यांच्यावर कारवाई होणार

    हे निंदनीय आहे, अशी आंदोलनं होणे

    अशा स्थितीत मेस्मा कायदा लावला जातो, मात्र तरीही आम्ही कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीने विचार केला

    जनतेला वेठीस धरून हा संप चालू शकणार नाही

    एसटी कर्मचाऱ्यांनी कोणाचं ऐकायचं हे त्यांनीच ठरवावं

    कोणी डोकी भडकवत असेल तर बळी पडू नका

  • 08 Apr 2022 06:39 PM (IST)

    शरद पवार Live

    आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही

    मी वेगळं सांगयाची गरज नाही

    संकट आल्यावर आपण सगळे एक आहोत हे तुम्ही दाखवून दिले

    गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न सुरू होता

    एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेकदा आपण पुढाकार घेतला

    कारण नसताना घरदार सोडून कर्मचारी बाहेर राहिला

    त्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात गेला

    त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना टोकाची भूमिका घ्यावी लागली

    त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना नैराश्य आलं ते नैराश्य काढण्याचा प्रयत्न केला

    ती भूमिका घ्यायला जबाबदार त्यांना भडकवणारे लोक आहे

    कार्यकर्ते कसे उभे राहतात हेही आपण पाहिलं

    टोकाची परंपरा घेणे महाराष्ट्राची परंपरा नाही

  • 08 Apr 2022 06:37 PM (IST)

    पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादीचे आंदोलन

    - शरद पवारांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन,

  • 08 Apr 2022 06:37 PM (IST)

    मालेगावात जुना आग्रारोडवर राष्ट्रवादीच्या वतीने रस्तारोको

    एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचेसर्वे सर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या आंदोलनाचे सर्वप्रथम मालेगावात पडसाद उमटले आहेत. मालेगावातील माजी आमदार असिफ शेख यांनी जुना आग्रा रोडवर रास्ता रोको आंदोलन केले.

  • 08 Apr 2022 06:10 PM (IST)

    शरद पवार सिल्व्हर ओकवरून निघाले

    शरद पवारांसोबत सुनिल तटकरे

    चौकशी करून कडक कारवाई होणार-आदित्य ठाकरे-

    दिलीप वळसे-पाटलांनीही घेतली शरद पवारांची भेट

    राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले

  • 08 Apr 2022 05:22 PM (IST)

    आदित्य ठाकरे शरद पवारांच्या घरी दाखल

    एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर पवारांच्या घरी नेत्यांची रिघ

  • 08 Apr 2022 05:08 PM (IST)

    मंत्री धनंजय मुंडे Live

    पवार साहेब नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजूनं उतरलेले आहेत. कुठलंही आंदोलन नेत्याच्या घरापर्यंत नेत्यापर्यंत गेलेलं नाही. या सरकारनं जे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतले ते कुणीच घेतलेले नाहीत... घरावर दगड फेकून, चप्पल फेकून प्रश्न सुटणार नाही..

    हे अतिशय दुर्दैवी आहे. या कर्मचाऱ्यांना कदाचित हा इतिहासही माहीत नाही का. की अनेक वर्ष आपली हयात घातली...आणि त्यांच्याच घरावर झालेलं हे आंदोलन संशयास्पद आहे. एकीकडे जल्लोष झाला आझाद मैदानात आणि दुसरीकडे चिथावणीखोर भाषणं सुरु होती. लोकशाहीचा गळा चिरडून मारण्याचं काम सुरु आहे की काय, असा हा प्रकार आहेत.

    एसटी कर्मचाऱ्यांना जे काही मिळालं ते पवार साहेबांच्या मध्यस्थीमुळे मिळालं. हे षडयंत्र आहे. याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. पवार साहेब आमचं दैवत आहेत. देशाच्या राज्याच्या माणसासाठी त्यांनी आयुष्य वाहिलंय. संपूर्ण राज्याची शांतता बिघडवण्याचा हा प्रयत्न कुणाकडून सुरु आहे, याचा तपास झाला पाहिजे.

  • 08 Apr 2022 05:07 PM (IST)

    मंत्री धनंजय मुंडे Live

    पवारांनी मातीतल्या माणसासाठी आयुष्य घातलं

    राज्यातली शांतता बिघडवण्याचा प्रयत्न

    कर्मचाऱ्यांच्या अडून दुसरं कोणतरी राजकीय पोळी भाजत आहे

  • 08 Apr 2022 04:57 PM (IST)

    वकील गुणरत्न सदावर्ते Live

    संविधानिक मर्यादा आम्ही कधी ओलांडली नाही

    अशी चुकीची सहानुभूती सरकारला मिळू शकणार नाही

    कोरोनात अनेक कर्मचारी मृत्यू पावले

    चौकशीआधी तुम्ही फाशी द्यायला निघाल्या

    आधी चौकशी करा आणि मग ठरवा

    सुप्रिया सुळे म्हणत होत्या चर्चा करायला तयार आहेत, त्या चर्चेतून आक्रमकता निर्माण झाली असेल

    राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही हा ड्रामा क्रिएट केलेला असू शकतो

  • 08 Apr 2022 04:55 PM (IST)

    वकील गुणरत्न सदावर्ते Live

    माझ्या वयक्तीक आयुष्यात एकही केस नाही

    मी चार वाजेपर्यंत कोर्टात होतो

    मला याबाबत कसलीही माहिती नव्हती

    प्रत्येक गोष्टीचे राजकारण करू नये

    विधवा झालेल्या भगिनींच्या आक्रोशावर कशाला राजकारण करता

    कुठे दिसतंय त्यात तिथे हल्ला केल्याचं

    हे भारतीय नागरिक आहेत, त्यांना बाहेरून आल्यासारखे वागवू नका

  • 08 Apr 2022 04:50 PM (IST)

    वकील गुणरत्न सदावर्ते Live

    सव्वाचार वाजेपर्यंत माझा युक्तीवाद चालला

    कोर्टातील काही माध्यम प्रतिनिधींनी मला व्हिडिओ दाखवलं

    मी शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन पाहिलं

    सुप्रिया सुळेंनी आधी चर्चेला कधी बोलवलं होतं हे सांगावं

    कोर्टाने अतिशय योग्य निकाल दिला आहे

    दिलीप वळसे-पाटील आता खोटं बोलले

    समितीचा रिपोर्ट जाहीर झाला पाहिजे असे कोर्टानं सांगितलं

    124 महिलांचं कुंकू पुसलं गेलं आहे

    मला या आंदोलनाची माहिती नव्हती

    काल निकाल लागल्यानंतर मी शांतता राखण्यास सांगितलं

    या महिला हल्ला करू शकत नाहीत

    या व्यतीत झालेल्या माहिला आहे, त्यांना हल्लेखोर म्हणू नका

    यामागे आणखी कोण असेल तर मला अजून खात्री झाली नाही

    चक्कर आलेल्या महिला हल्ला कशा करू शकतात

    आम्ही कोणत्याही हल्ल्याचे समर्थन करू शकत नाही

    कष्टकऱ्यांसाठी लढणं चुकीचे आहे का

  • 08 Apr 2022 04:45 PM (IST)

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील Live

    असे प्रकार घडवण्याचा अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू

    गेल्या साठ वर्षात अशी घटना घडली नाही

    यात तपास करून योग्य ती कारवाई करू

    हे सहन केलं जाणार नाही, हा अज्ञात शक्तींनी घडवलेला प्रकार आहे

    आज हे आंदोलन करणे हे चुकीचे होते, यातून काही साध्य होणार नाही

    राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही हे दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न

  • 08 Apr 2022 04:43 PM (IST)

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचं ट्विट

    एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे, असे ट्विट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

  • 08 Apr 2022 04:29 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत Live

    राजकीय परंपरेला कलंकीत करणारे हे कृत्य आहे

    सत्य स्वीकाल्यावर असे घडायला नको होतं

  • 08 Apr 2022 04:27 PM (IST)

    खासदार सुप्रिया सुळे Live

    मुंबई पोलिसांचे मी आभार मानते

    अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात झाली नाही

    आम्ही बसून चर्चेला तयार आहोत

    शांततेच्या मार्गाने घ्यावं, या मार्गातून प्रश्न सुटत नाही

    आधीही आम्ही चर्चा केली आहे

    शांततेच्या मार्गाने घेण्याची माझी विनंती आहे

    मला कुठल्याही प्रश्नाची गरज नाही

    आज माझ्या घरावर मोठा हल्ला झाला, हे दुर्दैवी आहे

  • 08 Apr 2022 04:24 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत Live

    कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यावर हे आंदोलन पेटलं गेलं

    हे आंदोलन विरोधकांनी पेटवलं आहे

    राज्यातलं सरकार अनेकांच्या डोळ्यात खुपत आहे

    जसं आज आंदोलन पाहिलं तसे आंदोलन आधी पाहिलं नाही

    हे लोकशाहीला शोभणारं हे आंदोलन नाही

    यांचे संस्कार पाहवे लागतील

  • 08 Apr 2022 03:57 PM (IST)

    सुप्रिया सुळे कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे

    एसटी कर्मचाऱ्यांशी मी बोलायला तयार आहे. मी एसटी कर्मचाऱ्यांशी बोलायला तयार आहे. माझी एसटी कर्मचाऱ्यांना विनम्र विनंती आहे शांततेच चर्चा करायला तयार आहे. माझी आई माझे वडील आणि मुलगी घरात आहे. मला त्यांना भेटून येऊद्या मी बोलायला तयार आहे. शांतता राखा या माहोलमध्ये कशी चर्चा करणार, अशी विनंती आंदोलकांना सुप्रिया सुळे करताना दिसून आल्या.

  • 08 Apr 2022 03:53 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांचं पवारांच्या घरावर आक्रमक आंदोलन

    एक पुरुष बोलत असतो -शरद पवार आमच्या विलीनीकरणाच्या आड आले.

    मध्येच एक महिला येते आणि प्रतिक्रिया देते - कुणाकुणाला अडवणार आहेत. आमचं वैर आहे सत्ताधाऱ्यांशी. आम्ही आज विधवा झालो आहोत. 120 जणांच्या नावानं मी चुडा फोडल्यात आज अजित पवार, शरद पवारांच्या दारात!

    आज माझा आक्रोश आहे त्यांच्याबद्दल.. आज माझी १२० भगिनी विधवा झाली त्यांच्या घरी काय अवस्था आहे ओ... त्यांची लेकरं रडायला लागलीये..

    आज पाच महिने झाले आम्ही आझाद मैदाना बसलेलो आहोत.. या निर्दयी सरकारला त्या कशाचीच जाणीव नाहीये.. प्रत्येकवेळी या शरद पवारांच्या हातात कारभार असल्याप्रमाणे मनमानी कारभार चालू आहे..आमची एकही समस्या ऐकली गेली नाहीये.. माझं कुटुंब रस्त्यावर आलं. आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून इथं आलेलो आहोत. आमचा काय छळ चाललाय, ते महाराष्ट्र पाहतोय. उपाशी आहोत. उपाशीपोटी आंदोलन करतोय. गालबोट लागावं असं कोणतंच वक्तव्य आजपर्यंत केलेलं नाही. पण आता आमच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जातोय

    एवढं झालं तरीही कुणीही आलेलं नाही...

  • 08 Apr 2022 03:49 PM (IST)

    शरद पवारांच्या घाराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन

  • 08 Apr 2022 03:12 PM (IST)

    प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस, शहराध्यक्ष, पुणे

    राज ठाकरे यांना सामाजिक तेढ निर्माण करायची आहे

    आम्ही तसं होऊ देणार नाही

    त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो

    वसंत मोरे आज जरी मनसेसोबतच आहे असं म्हणत असले तरी येणाऱ्या काळात मनसेचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील हा विश्वास

  • 08 Apr 2022 03:10 PM (IST)

    धुळ्यात मुस्लिम पदाधिकाऱ्याने मनसेचा दिला राजीनामा

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2 एप्रिल रोजी झालेल्या गुढीपाडव्याच्या सभेला मस्जिद वरील भोंग्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण विदयार्थी सेनेचे शहर उपाध्यक्ष इमरान शेख यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे राजीनामा पाठविला आहे. ठाकरे परिवाराशी माझी नाळ जुळली असून लवकरच शिवसेनेत प्रवेश करून मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे शेख म्हणाले. ठाकरेनी केलेल्या वक्तव्यामुळे मनसेत मुस्लिम पदाधीकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. मात्र त्यांच्या या निर्णयाला काही मुस्लिम नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याचे देखील समजते. धुळे जिल्हातून हा मुस्लिम पदाधिकाऱ्याचा पहिलाच राजीनामा असल्याचे समजते.

  • 08 Apr 2022 02:19 PM (IST)

    कोल्हापूरात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार - हसन मुश्रीफ

    मोदी आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली

    कोल्हापूरात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार - हसन मुश्रीफ

    महिला उमेदवार असताना व्यक्तीगत टीका करण विरोधकांना शोभत नाही

    आपण शहराचा विकास कसा करणार आहोत या मु्द्द्यावर निवडणुका व्हायला हव्यात

    परंतु खालच्या स्तरावर प्रचार होत असल्याचे दिसत आहे

    प्रचाराची पातळी पार खाली गेली आहे

    कोल्हापूर शहराचा विकास कसा करणार हे व्हिजन घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहे

    मोदीची आणि शरद पवारांची चर्चा झाली हे दादांना कसं कळालं

    सगळ्या केंद्रीय यंत्रणांवरती पवार साहेबांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • 08 Apr 2022 01:07 PM (IST)

    विजेच्या तुटवड्याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय, महाराष्ट्र सरकार गुजरातमधील वीज विकत घेणार

    - विजेच्या तुटवड्याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

    - महाराष्ट्र सरकार गुजरातमधील वीज विकत घेणार

    - राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

    - मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

  • 08 Apr 2022 12:06 PM (IST)

    एकमेकांना मदत करा, सुख दुखात सहभागी व्हा - छगन भूजबळ

    जनतेच्या कोर्टात लढा

    आम्ही कितीवेळा गेलो आणि आलो सुध्दा

    आपले कोण आणि दुसरे कोण हे ओळखा

    आपल्या पक्षाला अडचणी निर्माण करू नका

    एकमेकांना मदत करा, सुख दुखात सहभागी व्हा

    आज वक्त तुम्हारा, कल हमारा होगा

    भाजपला या संकटातून कस वाचवायचं याचा विचार करा

    फुले शाहू आंबेडकरांचे विचार या देशाला वाचवू शकतात

  • 08 Apr 2022 11:23 AM (IST)

    आत्तापर्यंत चार राजीनामे झाले आहेत - वसंत मोरे

    आजही मी मनसेचा सैनिक आहे

    मला राज ठाकरेंना भेटायचं आहे

    मी २७ वर्षे त्या पक्षासोबत संबंध आहे

    शहरामध्ये मला काही अडचणी येत आहे

    मे महिन्यापर्यंत शहराध्यक्ष राहतो

    त्यानंतर तुम्हाला ज्याला शहराध्यक्ष करायचा आहे त्याला करू द्या

    रमजानचे दिवस आहेत, तुम्ही भोंगा लावणार का ?

    मी राज साहेबांचा आदेश डावलला असा त्याचा विपर्यास काढण्यात आला

    कोणत्याही परिस्थित मी पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे तुम्हीही पक्ष सोडू नका

    आत्तापर्यंत चार राजीनामे झाले आहेत

    शहराध्यक्ष पदावरून हटवलं गेलं आहे का ?

    उद्धव ठाकरेंची खुली ऑफर

    माझा मेसेज माझा वाचला नाही असं कधी झालं नाही

    मला नक्की उत्तर येईल

    १२ तारखेला सभा आहे,

    मी एक सामान्यनेता आहे.

    मी एक मोठा नेता नाही

    राज साहेबांचा पहिला बॅनर लावणारा कार्यकर्ता

    मी आदेश धुडकावला नाही

    त्यावर माझं मत मांडलं आहे

    अचानक ज्यावेळी विषय आहे

    जर तर चा प्रश्न होता

    राजीनामे सुरू झाले आहेत

    आम्ही पक्षात राहून काम करण गरजेचं आहे

    राज साहेब हेचं पक्षाचं भवितव्य आहे.

    वसंत मोरेच्या भूमिकेमुळे पक्ष डॅमेज होऊ शकत

    मी मनसेतचं राहणार आहे.

    काल आम आदमी पार्टीचा देखील फोन आला होता.

    माझं काम पण तसं आहे

    माझ्या गाडीवर देखील राज साहेबांचा फोटो आहे

    रूपाली पाटील यांचे विचार वेगळे आहे

    माझ्या नावाला वेगळं वलय आहे

    वसंत मोरे पंधरा वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे

    राजकीय हत्या नाही आत्महत्या देखील नाही

    मी पक्ष सोडण्याचा अजून विचार केलेला नाही

    हकालपट्टी शब्दामुळे कार्यकर्त्यांच्या मनाला लागलं आहे.

    खूप दिवसाचे संबंध आहेत

    हा माझा बॅच आहे. हा बॅच राज ठाकरेंनी लावला आहे

    काही लोकांना आनंद झाला असेल

    मी साहेबांना फोन करण्याची माफी पात्रता नाही

  • 08 Apr 2022 10:52 AM (IST)

    वसंत मोरे यांना मुख्यमंत्र्यांची ऑफर, राज ठाकरेंशी बोलणं झाल्यानंतर निर्णय घेणार

    वसंत मोरे यांना मुख्यमंत्र्यांची ऑफर, राज ठाकरेंशी बोलणं झाल्यानंतर निर्णय घेणार

    माझं डायरेक्ट बोलणं झालेलं नाही

    भेटायला बोलावलं आहे

    रात्री मेसेज केलाय, पण मला रिप्लाय आलेला नाही

    मी साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे

    माझ्याकडे सगळ्या पक्षांच्या ऑफर आहेत

    शहराध्यक्षांचा राजीनामा

    अझरूद्दीन सय्यद यांचा देखील राजीनामा

  • 08 Apr 2022 10:43 AM (IST)

    महाराष्ट्राची जनता सगळं पाहत आहे - किरीट सोमय्या

    एक बिल्डर आणि व्यवसायिक यांच्यावर कारवाई करते

    महाराष्ट्राची जनता सगळं पाहत आहे - किरीट सोमय्या

    जिथ जाईल तिथं गुंड पाठवतात

    माझ काहीही म्हणणं नाही

    संजय राऊतांच्यात हिंमत नाही

    एकही कागद नसताना विनाकामाचे आरोप होत आहेत

    विक्रांतचा आरोप केला आहे

    अकरा वर्षात त्यांना आता आठवलं आहे

    त्यावेळी राज्यपालांना आम्ही भेटलो

    प्रणव मुखर्जीना भेटलो होतो.

    ५८ कोटी चोरीला गेले आहेत

    मोहिमेचा भाग वेगळा आहे

    खोटे आरोप केले आहेत

    सोशल मीडियावर सगळं उपलब्ध आहे

    तक्रारदार दुरूपयोग केला आहे

  • 08 Apr 2022 10:20 AM (IST)

    मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत - संजय राऊत

    मुंबई कशी केद्रशाषित कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे

    किरीट सोमय्या हा महाराष्ट्रदोषी आहे.

    दोन महिन्यांपासून माझं त्यांच्यावरती लक्ष आहे

    मुंबईतला मराठी तोडण्यासाठी प्रयत्न केला जात आहे

    किरीट सोमय्या काय तरी कागद घेऊन दिल्लीत जातात

    त्याचं षडयंत्र सुरू आहे

    एक वाराणसीचा एक लपंगा आहे

    एक मोठा बिल्डर आहे

    तिघांनी मिळून प्लॅन तयार केला आहे

    मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत

  • 08 Apr 2022 09:24 AM (IST)

    हसन मुश्रीफ यांनी स्वत:ला संभाळावं, काही दिवसांनी मेव्हला - किरीट सोमय्या

    दिल्लीतून किरीट सोमय्या

    ज्यावेळी मालमत्ता जप्त व्हायला लागली, त्यावेळी दिवसा संजय राऊत यांना भूत दिसायला लागलं आहे

    हसन मुश्रीफ यांनी स्वत:ला संभाळावं

    काही दिवसांनी त्यांनी त्यांच्या मेव्हण्याला सांभाळाव

    विक्रांत भंगारमध्ये काढू नका...

    दोन दोन रूपये जमा केले

    संजय राऊत जे म्हणतात ते लिहून काढवा...

    ५८ कोटीचा आकडा

    ११ वर्षानंतर संजय राऊतांना आठवलं

    नील सोमय्यांच्या कंपनीत पैसा कुठून गेला

    किरीट सोमय्याला अटक करा

    आता मी पोलिसांना घेरणार, उद्धव ठाकरेंना घेरणार

    पुरावे द्या, याचा मी जाब विचारणार आहे

    ती व्यक्ती भावनात्मक आहे

    माझ्याकडे एफआयआर देत नव्हते

  • 08 Apr 2022 08:07 AM (IST)

    जिल्ह्यातील एसटी कर्मचारी हजर होण्यासाठी आठवडा लागणार

    रत्नागिरी- जिल्ह्यातील एसटी कर्मचारी हजर होण्यासाठी आठवडा लागणार

    आठवड्यानंतर एसटीचे अडिज हजार कर्मचारी कामावर हजर होणार

    २२ एप्रिल पर्यत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे न्यायलायचे आदेश

    मागील चार महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर

    एसटी कर्मचारी कामावर हजर होण्याच्या शक्यतेने शहर बस वाहतुक सुरु होणार

  • 08 Apr 2022 08:07 AM (IST)

    राज्यपाल भगतसिंग कोशारी उद्यापासून नाशिक दौऱ्यावर

    नाशिक - राज्यपाल भगतसिंग कोशारी उद्यापासून नाशिक दौऱ्यावर

    राज्यपाल शनिवार पासून नाशिक मध्ये दोन दिवस

    सिन्नरच्या गारगोटी संग्रहालय ला देणार भेट

    राज्यपालांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना राज्य मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित राहणार

  • 08 Apr 2022 08:05 AM (IST)

    यशवंत जाधवांना मोठा झटका, 40 मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, सूत्रांची माहिती

    मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांना मोठा झटका बसला आहे. यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्ता आयकर विभागाकडून (Income Tax) तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय जाधव यांचा वांद्रे भागातील पाच कोटी रुपयांचा फ्लॅटही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भायखळ्यात 26 फ्लॅट्सवर जप्तीची कारवाई झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यशवंत जाधव यांच्या मालकीच्या काही मालमत्ता नातेवाईकांच्या माध्यमातून चालवल्या जात होत्या, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यशवंत यांचे पुतणे विनित जाधव आणि मोहिते नावाच्या नातेवाईकालाही समन्स पाठवण्यात आल्याची माहिती आहे. आधी यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये रोकड आणि 50 लाख रुपये किमतीचे घड्याळ दिल्याचा उल्लेख होता, तर त्यानंतर ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ अशा दोन व्यक्तींसोबत एक कोटी 75 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचंही समोर आलं होतं. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जाधव दाम्पत्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

  • 08 Apr 2022 06:26 AM (IST)

    या बॅनरमुळे कोथरुडमध्ये राजकीय चर्चांना उधाण

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने कोथरूड परिसरात लागले 'दादा परत या' चे बॅनर

    'पुणे शहरातील कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या महिन्याभरापासून गेले आहेत. कुणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा' अशा स्वरूपाचा आशय

    तर दुसऱ्या एका फ्लेक्सवर, 'दादा परत या , दादा एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाहीये. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या. आम्ही तुमची वाट पाहतोय!' असं लिहण्यात आलयं

    त्याखाली समस्त कोथरूडकरांची विनंती असल्याचा उल्लेखही करण्यात आलाय

    या बॅनरमुळे कोथरुडमध्ये राजकीय चर्चांना उधाण

  • 08 Apr 2022 06:25 AM (IST)

    गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर आणखी दोन रुपयांनी वाढवला

    पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज डेअरीने गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर आणखी दोन रुपयांनी वाढवला

    मागील तीन आठवड्यातील ही तिसरी दरवाढ असून या नव्या निर्णयानुसार कात्रज डेअरी जिल्ह्यातील सोमवार पासून शेतकऱ्यांकडून आता प्रतिलिटर 35 रुपये लिटरने गाईचे दूध खरेदी करणार

    इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ, पशुखाद्याचे वाढलेल्या दर, आणि दूध उत्पादनात झालेली घट लक्षात घेऊन घेण्यात आला निर्णय

  • 08 Apr 2022 06:24 AM (IST)

    पुणे रेल्वेने तब्बल 2 लाख 17 हजार 633 फुकट्या प्रवाश्यांनावर केली कारवाई

    रेल्वेतून विनातिकीट किंवा योग्य तिकीट न घेता प्रवास करणाऱ्यांवर रेल्वेकडून यंदाही जोरदार कारवाई

    नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत पुणे रेल्वेने तब्बल 2 लाख 17 हजार 633 फुकट्या प्रवाश्यांनावर केली कारवाई

    या फुकट्या पर्वषयांकडून करण्यात आली तब्बल 10कोटी 94 लाख 66 हजार रुपयांच्या दंडाची वसुली

  • 08 Apr 2022 06:24 AM (IST)

    यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान

    पुणे शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून काही भागात कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार

    बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवस शहरात 40.01अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद

    यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान

    या पूर्वी 2020 मध्ये 17 एप्रिल रोजी इतक्याच उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती

    येत्या बुधवारपर्यंत ही स्थिती अशीच कायम राहणार असून पुणे व परिसरात कमाल तापमानाचा पारा चाळिशी पार कायम राहणार

    तर पिंपरी चिंचवड येथे 42 अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहचण्याची शक्यता

  • 08 Apr 2022 06:23 AM (IST)

    अकोला शहरात बिछायातच्या गोडावून ला मोठी आग

    अकोला शहरात बिछायातच्या गोडावून ला मोठी आग....

    मोठी उमरी परिसरातील ताथोड मधील घटना....

    स्वागत बिछायत केंद्राचे आहे गोडावून....

    या आगीत बिछायतचे आणि फायबर डेकोरेशन चे साहित्य जळून खाक....

    ही आग वीझवन्यासाठी अग्निशमन विभागाच्या आतापर्यंत 7 गाड्या लागल्या आहेत....

    या आगीत कुठलीही जीवित हानी नसून...50 ते 60 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे....

    सकाळी 3 ते साडेतीन च्या दरम्यान लागली आग....

    काही वेळातच आगीने घेतले रुद्ररूप....

Published On - Apr 08,2022 6:21 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.