मुंबईत अधिवेशन घेतल्याने कोरोना कमी होतो आणि नागपूरला वाढतो? सरकारला नोबेल द्यायला हवा; भाजपचा सरकारला चिमटा

| Updated on: Nov 12, 2020 | 4:46 PM

मुंबईत अधिवेशन घेतलं की कोरोना कमी होतो आणि नागपूरमध्ये घेतलं की वाढतो. अशी कल्पना सरकारच्या सुपिक डोक्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारला नोबेल पुरस्कार द्यायला हवा, असा चिमटा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला काढला.

मुंबईत अधिवेशन घेतल्याने कोरोना कमी होतो आणि नागपूरला वाढतो? सरकारला नोबेल द्यायला हवा; भाजपचा सरकारला चिमटा
Follow us on

नागपूर : मुंबईत अधिवेशन घेतलं की कोरोना कमी होतो आणि नागपूरमध्ये घेतलं की वाढतो. अशी कल्पना सरकारच्या सुपिक डोक्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारला नोबेल पुरस्कार द्यायला हवा, असा चिमटा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी सरकारला काढला. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. (sudhir mungantiwar slams state government on assembly winter session)

“राज्य सरकारच्या सुपिक डोक्यात कल्पना आली की मुंबईत अधिवेशन घेतलं की कोरोना कमी होतो. नागपूरमध्ये अधिवेशन घेतलं की कोरोना वाढतो. तसे असेल तर सरकारला नोबेल पुरस्कार दिला पाहिजे” असं मुनगंटीवार म्हणाले. तसेच सरकारने यावर रिसर्च पेपर केला का? असा खोचक सवालही सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला केला.

मागील काही दिवसांपासून हिवाळी अधिवेशनावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याच्या विचार ठाकरे सरकारने केला आहे. तर, अधिवेशन नियमाप्रमाणे नागपुरातच व्हावे असा पवित्रा विरोधकांचा आहे. त्यावर माजी मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वरील भाष्य केले.

सरकारकडून विदर्भावर अन्याय

मुनगंटीवार म्हणाले, “विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपला. मात्र अजूनही सरकारने त्याची पुनर्रचना केली नाही. हिवाळी अधिवेशन देखील मुंबईत हलविलं आहे. या सर्व गोष्टींमुळे विदर्भावर अन्याय होत आहे. हे सरकार विदर्भावर अन्याय करणारं सरकार आहे.” तसेच, निदान विदर्भवाद्यांचं नेतृत्व करणाऱ्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीतरी याला विरोध करायला हवा होता; अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, हिवाळी अधिवेशन मुंबईला घेण्यात येणार असलं तरी मार्च महिन्यातील अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली. तर, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेऊ, विदर्भाला मोठा न्याय मिळेल असे ऐतिहासिक अधिवेशन नागरपुरात घेऊ, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. नाना पटोले भंडारा येथे पत्रकारांशी बोलत होते.

संबंधित बातम्या :

हिवाळी अधिवेशनातील खर्च नागपुरातील आरोग्य यंत्रणेला द्या, काँग्रेस आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

हिवाळी अधिवेशनातून सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करतेय, गिरीश महाजनांचं टीकास्त्र

“नागपुरात अधिवेशन घ्यायचं असेल तर मातोश्रीच्या बाहेर पडावं लागेल”

(sudhir mungantiwar slams state government on assembly winter session)