जे आळूच्या वड्या खातात त्यांचाचं घसा खवखव करतो, सुजय विखेंचे सुप्रिया सुळेंना प्रतिउत्तर

युपीएटच्या काळात 10 वर्षात महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखाने बंद केले होते. आज राज्यातल्या महाविकास आघाडीतील 70 टक्के मंत्र्यांनी ते कमी दरात पुन्हा ताब्यात घेतल्याचं चित्र आहे.

जे आळूच्या वड्या खातात त्यांचाचं घसा खवखव करतो, सुजय विखेंचे सुप्रिया सुळेंना प्रतिउत्तर
भाजपाचे खासदार, सुजय विखे पाटील
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 8:17 AM

अहमदनगर – लोकसभेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) आणि भाजपा खासदार सुजय विखे पाटील (sujay vikhe patil) यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं, तिथं सहकारी साखर कारखाना, त्याची अवस्था आणि त्याचा राजकीय फायदा या विषयावर दोघांमध्ये चांगलचं वाचलं असल्याचं पाहायला मिळालं. सुजय विखे पाटील यांनी कारखाने बंद पाडल्याचा आरोप युपीए (UPA) सरकारवरती केला, तसेच सध्या बंद असलेले कारखाने त्याच्याकडून कमी पैशात घेत असल्याचा सुध्दा आरोप केल्याने सुप्रिया सुळेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ज्यावेळी सहकार क्षेत्राविषयी निर्णय घेतले गेले त्यावेळी त्याचे वडिल सहकारमंत्री असल्याची आठवण सुप्रिया सुळे यांनी करून दिली. तसेच त्यांना विचारात घेतल्याशिवाय युपीएच्या काळात कोणताचं निर्णय घेतला नसल्याची आठवण सुजय विखे पाटील यांना करून दिली.

नाव न घेता पवार कुटुंबियावर टीका

त्यानंतर राहता येथील एका कार्यक्रमात सुजय विखे पाटील “आम्ही मिठाला जागावं की नाही, हे त्यांनी आम्हाला शिकवू नये, जे कधीच कुणाच्या मिठाला जागले नाहीत” अशी टीका त्यांनी पवार कुटुंबियांवर नाव न घेता केली. तसेच राधाकृष्ण विखे पाटील किंवा स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील हे कोणत्या पक्षाच्या जिवावर राजकारणात जिवंत नाहीत, त त्यांना गोरगरिब जनतेने मतदान केले असल्याने ते राजकारणात टिकून आहेत असाही टोला सुजय विखे पाटील यांनी लगावला. मी लोकसभेत जे काही भाषण केलं, त्यावेळी मी कोणाचंही नाव घेतलं नव्हत. त्यावेळी मी फक्त युपीएच्या सहकार क्षेत्राविषयी बोलत होतो. ज्यांनी सहकार क्षेत्र बुडविले तेचं आज त्याला उभारी देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मी म्हणटले होते असंही ते म्हणाले.

जे आळूच्या वड्या खातात त्यांचाच घसा खवखव करतो

युपीएटच्या काळात 10 वर्षात महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखाने बंद केले होते. आज राज्यातल्या महाविकास आघाडीतील 70 टक्के मंत्र्यांनी ते कमी दरात पुन्हा ताब्यात घेतल्याचं चित्र आहे. आज ते मालक होऊन बसले आहेत. यावर सुप्रिया सुळेंनी त्यांना त्यावेळी त्याचे बाबा सहकार मंत्री असल्याची आठवण करून दिली होती. त्यावर काल बोलताना सुजय विखे म्हणाला की जे आळूच्या वड्या खातात त्यांचाच घसा खवखव करतो.

बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची दुटप्पी भूमिका, मंजूर कामात घातला खोडा; शिवसेनेचा आरोप

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.