AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दलित, वंचित, शोषित, गरिबांसाठी काय केलं? समानतेचा संदेश देणाऱ्या मूर्तीचं अनावरण करताना मोदींचं उत्तर

Statue of Equality : सुधारणेसाठी आपल्या मुळांपासून दूर जाण्याची गरज नाही.आपल्या मुळांशी जोडलं जाणं, आपल्या वास्तविक शक्तीशी ओळख करुन घेणं, हेच गरजेचंय. रामानुजाचार्यांनी हेच सांगितलं, असं मोदींनी म्हटलंय.

दलित, वंचित, शोषित, गरिबांसाठी काय केलं? समानतेचा संदेश देणाऱ्या मूर्तीचं अनावरण करताना मोदींचं उत्तर
सरकारी योजनांचा मोदींनी वाचला पाढा
| Updated on: Feb 05, 2022 | 8:06 PM
Share

हैदराबाद : हैदराबादेत वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्यात समानतेचा संदेश देणाऱ्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं. भव्यदिव्य असणाऱ्या रामानुजाचार्य यांच्या मूर्तीचं (Statue Of Equality) अनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते करण्यात आलं. यावेळी लोकार्पणाचा सोहळा पार पडल्यानंतर मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी समानतेचा संदेश देणाऱ्या रामानुजाचार्य (Sant Ramanujacharya) यांच्या विचारांचं अनुकरत करत सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या धोरणावर केंद्र सरकार काम करत असल्याचा दावा मोदींनी यावेळी केला. सरकारी योजनांचा दलितांना, शोषितांना, मागासलेल्यांना, गरिबांना समान न्याय मिळावा, यासाठी कटीबद्ध असल्याचं मोदींनी म्हटलंय. समानतेचा धागा पकडून मोदींनी सरकार देशाच्या विकासासाठी झटत असल्याचं यावेळी म्हटलंय. सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, तोही कोणताही भेदभान न होता, असं मोदींनी यावेळी म्हटलंय. तसंच सामाजिक न्यायही सगळ्यांच्या बाबतीत सारखा झाला पाहिजे, असंही मोदींनी यावेळी म्हटलंय.

काय म्हणाले पंतप्रधान?

लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मोदींनी म्हटलंय की,…

आजचा बदलणारा भारत एकत्र होऊन सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करतोय. सरकार ज्या योजना सुरु करतेय, त्यांचा मोठा लाभ हा दलित आणि मागासलेल्यांना होतोय. पक्के घर देण्यापासून, उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्यापर्यंत, तसंच पाच लाखात मोफत उपचार देण्यापासून मोफत वीज कनेक्शन देण्यापर्यंत.. तसंच जनधन खात्यापासून करोडो शौचालयांचं निर्माण करण्यापर्यंत असो, वेगवेगळ्या योजनांमधून गरीब, दलित, वंचित आणि शोषित वर्गाचं भलं करण्यासाठी सरकारनं काम केलंय. सगळ्यांना सशक्त केलंय.

दरम्यान मोदींनी म्हटलंय की, आज देशात जेव्हा सुधारणेची चर्चा होते, तेव्हा मला रामानुजाचार्य आठवतात. जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहतो, तेव्हा याची जाणीव होते, की प्रगतीशिलता आणि प्राचीनता मध्ये काहीही विरोध नाही. सुधारणेसाठी आपल्या मुळांपासून दूर जाण्याची गरज नाही.आपल्या मुळांशी जोडलं जाणं, आपल्या वास्तविक शक्तीशी ओळख करुन घेणं, हेच गरजेचंय. रामानुजाचार्यांनी हेच सांगितलं, असं मोदींनी म्हटलंय.

भव्य मूर्तीचं लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवारी, 5 फेब्रुवारी 2022) वसंत पंचमीच्या मुहूर्तावर ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’चं लोकार्पण करण्यात आलं. पवित्र मंत्रोच्चाराच्या स्वरात मोदींच्या हस्ते संत रामानुजाचार्य  यांच्या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आलं. सोनं, चांदी, पितळ, तांबे आणि जस्त या शुद्ध पंचधातूने तयार करण्यात आलेल्या या स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचं लोकार्पण करण्यात आलं. तब्बल 200 एकरहून अधिक परिसरात हा पुतळा वसविण्यात आलाय. पुतळ्याचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हात जोडून संत रामानुजाचार्य यांना अभिवादन केलं. यावेळी साधूसंत आणि मोजकेच पाहूणे उपस्थित होते. रामानुजाचार्य स्वामींचं हे एक हजारावं जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांची जगातील दुसरी भव्य मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Statue Of Equality: संत रामानुजाचार्यांचे विचार आजही जगाला मार्गदर्शक: नरेंद्र मोदी

रामानुजाचार्य यांच्याबद्दल बोलताना मोदींकडून बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख! यामागचा नेमका संदर्भ काय?

PHOTO | Statue of Equality: पीएम मोदींच्या हस्ते रामानुजाचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण, पहा पुतळ्याचे विलोभनीय फोटो

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.