Sanjay Raut: ‘साथ कायम असेल! पवारांनी शब्द दिलाय’ संजय राऊतांचं वक्तव्य, ठाकरे अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत?

| Updated on: Jun 30, 2022 | 10:50 AM

शरद पवार व संजय राऊत यांना दोष दिला जातोय. हे सगळे मंत्री महाविकास आघाडी सरकार मध्ये मंत्री होते. त्यांना चांगली खादगी मिळत होती. मात्र कुणीही काही बोलले नाही. किंबहुना महाराष्ट्रात एक नवी फळी तयार होत आहे. तसेच हा प्रयोग पुन्हा पुन्हा झालं पाहिजे असे अनेकांनी म्हटल्याची वक्तव्ये आहेत. त्यांना नक्की मंत्रीमंडळात पदं मिळतील. कोणत्याही कारणाने बाहेर पडायचं आहे, त्यामुळे त्यांनी काड्या केल्या.

Sanjay Raut: साथ कायम असेल! पवारांनी शब्द दिलाय संजय राऊतांचं वक्तव्य, ठाकरे अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत?
Sanjay Raut
Image Credit source: Tv9
Follow us on

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray)यांनी काल आपल्या मुख्यमंत्री पदाचा व विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर महाराष्ट्रात(Maharashtra) कश्याप्रकारची परिस्थती निर्माण करण्यात आली आणि राजीना द्यावा लागला. हे उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमी व सभ्य भाषेत जनेतला संगितले. त्यापूर्वी त्यांनी हेही सांगितलं की कसे आपल्या लोकांनी दगाबाजी केली. आपल्याच लोकांनी खंजीर खुपसले पाठीत. अश्या प्रकारचे वातावरण निर्माण झाल्यानंतर , सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयानंतर खुर्चीला चिटकुन राहण्यात अर्थ नव्हता आणि नाही.कारण ठाकरे कधीच सत्तेचे लालची नव्हते. एका विशिष्ट परिस्थीत शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री व काँग्रेस नेतृत्वाने पदी बसण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी ती मान्य केली. त्यानीच पाठीत खंजीर खुपसला अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

अन आज शरद पवारांना दोष देताय

आज आमच्या नावाने तोंडाची जी डबडी वाजली जात आहे. जे शरद पवार व संजय राऊत यांना दोष दिला जातोय. हे सगळे मंत्री महाविकास आघाडी सरकार मध्ये मंत्री होते. त्यांना चांगली खादगी मिळत होती. मात्र कुणीही काही बोलले नाही. किंबहुना महाराष्ट्रात एक नवी फळी तयार होत आहे. तसेच हा प्रयोग पुन्हा पुन्हा झालं पाहिजे असे अनेकांनी म्हटल्याची वक्तव्ये आहेत. त्यांना नक्की मंत्रीमंडळात पदं मिळतील. कोणत्याही कारणाने बाहेर पडायचं आहे, त्यामुळे त्यांनी काड्या केल्या. आज शरद पवारांना दोष दिला जात आहे. कालपर्यंत आम्ही त्यांच्या विषयी भावना व्यक्त करीत होतो. त्यांना जे करायचं कॉन्ट्रक्ट मिळालं होतं. ते त्यांनी करून दाखवलंय.

येणाऱ्या सरकारने महाराष्ट्राचं काम करावं

पण आम्ही महाराष्ट्रावरती प्रेम करणारे नेते आहोत. महान लोकांनी हे राज्य घड़वलं आहे. ठाकरेंवरती लोकांना विश्वास होता. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी देखील विश्वास दाखवला. पहिल्या दिवसांपासून सरकार पाडण्याचा प्रयत्न होता. आमदारांवरती दबाव आणला. आता सरकारचं नेतृत्व कोण करतंय माहित नाही. येणाऱ्या सरकारने महाराष्ट्राचं काम करावं त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.

हे सुद्धा वाचा