Sanjay Raut : काल मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, भाजपचं सरकार येण्याची चिन्हे, संजय राऊत म्हणतात, ‘जय महाराष्ट्र’

एकनाथ शिंदेंची बंडखोरी आणि उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यापर्यंत अनेक घडामोडी घडल्या. बंडखोर आमदारांसोबतसह एकनाथ शिंदे अगोदर गुजरात आणि नंतर आसाम येथे वास्तव्यास होते. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांचे एक ट्विट प्रचंड चर्चेत आहे. राऊत यांनी ट्विटमध्ये जय महाराष्ट्र लिहित शिवसेनेचे चिन्ह धनुष्य बाणाचा एक फोटो शेअर केला आहे.

Sanjay Raut : काल मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, भाजपचं सरकार येण्याची चिन्हे, संजय राऊत म्हणतात, 'जय महाराष्ट्र'
संजय राऊत Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 10:38 AM

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीनंतर राजकिय घडामोडींना प्रचंड वेग आला. शिंदे यांनी आम्ही महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत हे जाहीर करताच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे एक पत्र राज्यपालांनी पाठवले. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेलं. रात्री उशीरा यावर कोर्टाने आपला निकाल दिला. कोर्टाने महाविकास आघाडी सरकारची मागणी मान्य केली नाही आणि त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा दिला.

संजय राऊत यांनी केलेले ट्विट

संजय राऊत यांचे ट्विट प्रचंड चर्चेत

एकनाथ शिंदेंची बंडखोरी आणि उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यापर्यंत अनेक घडामोडी घडल्या. बंडखोर आमदारांसोबतसह एकनाथ शिंदे अगोदर गुजरात आणि नंतर आसाम येथे वास्तव्यास होते. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांचे एक ट्विट प्रचंड चर्चेत आहे. राऊत यांनी ट्विटमध्ये जय महाराष्ट्र लिहित शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणाचा एक फोटो शेअर केला आहे. मात्र, राऊतांच्या या ट्विटचा नेमका काय अर्थ होतो, याचा लोक वेगवेगळा अंदाजा लावताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांबद्दल संजय राऊत यांनी अनेक वादग्रस्त विधाने देखील यादरम्यान केली.

संजय राऊत म्हणाले की…

उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व अत्यंत संयमी आणि सभ्य होतं. काल त्यांनी राजीनामा दिला आहे. आपल्या लोकांनी दगाबाजी केली. खुर्चीला चिटकुन राहण्यात अर्थ नाही. शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री पदी बसण्याची विनंती केली होती. तसेच ती त्यांनी मान्य केली. आज आमच्या नावाने जी डबडी वाजली जात आहे. त्यांना नक्की मंत्रीमंडळात पदं मिळतील. कोणत्याही कारणाने बाहेर पडायचं आहे, त्यामुळे त्यांनी काड्या केल्या. आज शरद पवारांना दोष दिला जात आहे. कालपर्यंत आम्ही त्यांच्या विषयी भावना व्यक्त करीत होतो.

येणाऱ्या नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या

पुढे राऊत म्हणाले की, त्यांना जे करायचं कॉन्ट्रक्ट मिळालं होतं. ते त्यांनी करून दाखवलंय. पण आम्ही महाराष्ट्रावरती प्रेम करणारे नेते आहोत. महान लोकांनी हे राज्य घड़वलं आहे. ठाकरेंवरती लोकांना विश्वास होता. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी देखील विश्वास दाखवला. पहिल्या दिवसांपासून सरकार पाडण्याचा प्रयत्न होता. आमदारांवरती दबाव आणला. आता सरकारचं नेतृत्व कोण करतंय माहित नाही. येणाऱ्या सरकारने महाराष्ट्राचं काम करावं त्यांना माझ्याकडून शुभेच्छाच असे राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.