Devendra Fadnavis: अखेर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, पण भाजपच्या गटात म्हणावा तसा उत्साह का नाही? 4 कारणं

ओढावलेल्या राजकीय परस्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. गुरुवारी बहुमत सिध्द करण्यापूर्वीच राजकीय स्थितीचा आढावा घेऊन त्यांनी राजीनामा दिला. मात्र, त्यांच्या या निर्णयानंतर लागलीच सोशल मिडियावर भावनिक लाट निर्माण झाली आहे. शांत, संयमी नेतृत्व असतानाच घरच्या सदस्यांनीच कुटुंबप्रमुखाला दगाफटका दिल्याची जन समुदयाची भावना सोशल मिडियावर उमटत आहे.

Devendra Fadnavis: अखेर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, पण भाजपच्या गटात म्हणावा तसा उत्साह का नाही? 4 कारणं
देवेंद्र फडणवीस
राजेंद्र खराडे

|

Jun 30, 2022 | 10:21 AM

मुंबई : (Shivsena) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्याच्या राजकीय नाट्यावर पडदा पडला असे वाटत असले तरी हे सर्व नैसर्गिकरित्या झाले असे नाही. गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी प्रयत्न केले जात होते हे आता काही लपून राहिले नाही. त्यामुळे राजकीय उलथापालथीनंतर आता (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असले तरी (BJP) भाजपाच्या गटात म्हणावा तसा उत्साह दिसत नाही. याकरिता केवळ एक घटक कारणीभूत असे नाही तर विविध अंगाने याचे विश्लेषण करता येणार आहे.मुख्यमंत्री पद हे जरी भाजपाकडे राहणार असले तरी शिंदे गटालाही तेवढेच महत्व द्यावे लागणार आहे. त्यामुळे भाजपाच्या आमदारांनी लॉबिंग करण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस मंत्री पदासाठी जरा कळ सोसा असाही सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे सर्वकाही अलबेल आहे असे नाही. शिवाय सत्तेसाठी भाजपाने केलेला प्रवास हा लपून राहिलेला नाही.

शिवसेनेला भगदाड अन् सत्ता स्थापन

भाजपाकडून आता सत्ता स्थापन केली जाणार असली तरी सर्वकाही सरळ मार्गाने झाले असे नाही. 25 वर्ष जो मित्रपक्ष होता त्याच शिवसेनेला खिंडार पाडून ही सत्ता स्थापना होत आहे. हा बदल सर्वांनाच रुचेल असे नाही. शिवाय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील उद्धव ठाकरे यांचा राजीनामा म्हणजे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असे नाही म्हणले आहे. शिवसेनेला विशेषत: उद्धव ठाकरे यांना घेऊन ही सत्ता स्थापन झाली असती तर याचे वेगळे महत्व होते पण बदलत्या राजकीय परस्थितीनुसार होत असलेले बदल यामुळे सर्वच काही अलबेल असे नाही.

सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंबद्दल इमोशनल लाट

ओढावलेल्या राजकीय परस्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. गुरुवारी बहुमत सिध्द करण्यापूर्वीच राजकीय स्थितीचा आढावा घेऊन त्यांनी राजीनामा दिला. मात्र, त्यांच्या या निर्णयानंतर लागलीच सोशल मिडियावर भावनिक लाट निर्माण झाली आहे. शांत, संयमी नेतृत्व असतानाच घरच्या सदस्यांनीच कुटुंबप्रमुखाला दगाफटका दिल्याची जन समुदयाची भावना सोशल मिडियावर उमटत आहे. भाजपा सत्ता स्थापन करणार असली तरी मुख्यमंत्री कसा असावा याचे उदाहरण उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निर्णयानंतर भावनिक पोस्टचा पाऊस सोशल मिडियावर होत आहे.

अडीच वर्षच सत्ता

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या अडीच वर्षापासून भाजपा हे विरोधी बाकावर होते. आता एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर चित्र बदलत असले तरी ही सत्ता अडीच वर्षच उपभोगता येणार आहे. अडीच वर्षानंतर पुन्हा निवडणुकीला सामोरे हे जावेच लागणार आहे. शिवाय सत्तेसाठी भाजपाने केलेले प्रयत्न, शिंदे गटाच्या पडद्यामागचे राजकारण आता हे लपून राहिले नाही. त्यामुळे अडीच वर्षासाठी भाजपाची सत्ता येत असली तरी आव्हाने कायम राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाबद्दल खात्रीचा आभाव

सध्या शिंदे गटातील आमदारांची संख्या ही 39 वर आहे. शिवाय प्रत्येकजण हा मंत्री पदासाठी इच्छूक आहे. अशातच शिंदे गट हा कायम हीच भूमिका ठेवणार की यामध्ये सत्ता स्थापनेनंतर काय बदल होईल हे तर कोणीच सांगू शकत नाही. हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासण्यासाठी आलेल्या आमदारांची एकजूट किती दिवस आणि कशी कायम राहणार हे देखील महत्वाचे आहे. सत्ता स्थापन होण्यापूर्वीच गुवाहटीमधील हॉटेलमध्ये आमदारांमध्येच फ्री स्टाईल हाणामार झाल्याचे वृत्त होते ते आता महाराष्ट्रात आणि सत्तेत आल्यावर काय होणार हे पहावे लागणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें