AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सची सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक, गुजरात जायंट्सला 7 विकेटने लोळवलं

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सने एन्ट्री मारली आहे. सलग चौथ्यांदा दिल्ली कॅपिटल्सची अंतिम फेरीत वर्णी लागली आहे. एलिमिनेटर फेरीत दिल्लीने गुजरात जायंट्सला 7 गडी राखून पराभूत केलं.

WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सची सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक, गुजरात जायंट्सला 7 विकेटने लोळवलं
WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सची सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक, गुजरात जायंट्सला 8 विकेटने लोळवलंImage Credit source: WPL/BCCI
| Updated on: Feb 03, 2026 | 10:54 PM
Share

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या एलिमिनेटर फेरीत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सला 8 गडी राखून पराभूत केलं. तसेच चौथ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना आरसीबीशी होणार आहे. मागच्या तीन पर्वात दिल्ली कॅपटिल्सच्या पारड्यात अपयश आलं होतं. दोन वेळा मुंबई इंडियन्सने आणि एकदा आरसीबीने पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे चौथ्यांदा जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होईल का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. एलिमिनेटर फेरीत दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 168 धावा केल्या आणि विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं. दिल्ली कॅपिटल्सने हे आव्हान 3 गडी गमवून 16 व्या षटकात पूर्ण केलं.

दिल्ली कॅपिटल्सकडून लिझेल ली आणि शफाली वर्मा यांनी आश्वासक सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी 7.1 षटकात 89 धावांची भागीदारी केली. लिझेल ली 24 चेंडूत 43 धावा करून बाद झाली. तिने 8 चौकार आमि 1 षटकार मारला. त्यानंतर शफाली वर्मा 21 चेंडूत 31 धावा करून बाद झाली. दोन विकेट पडल्यानंतर लॉरा वॉल्वार्ड आणि जेमिमा रॉड्रिग्स ही जोडी जमली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. यासह विजयाची स्क्रिप्ट लिहिली गेली. दिल्ली कॅपिटल्सचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर असताना जेमिमा रॉड्रिग्स 23 चेंडूत 41 धावा करून बाद झाली. तिने 4 चौकार आणि 1 षटकार मारला होता.

गुजरातकडून बेथ मूनी वगळता एकही फलंदाज साजेशी कमगिरी करून शकला नाही. तिने 51 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 62 धावा केल्या. तसेच मधल्या फळीत जॉर्जिया वारेहमने 35 धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सकडून चिनेले हेन्रीने भेदक गोलंदाजी केली. तेने 35 धावा दिल्या पण तीन विकेट काढल्या. तर नंदनी शर्माने 2 विकेट आणि मिन्नू मनीने एक विकेट काढली.

गुजरात जायंट्सची कर्णधार एश गार्डनर म्हणाली की, आम्हाला वाटले की ते स्पष्टपणे बचाव करण्यायोग्य धावा आहेत. मी म्हटल्याप्रमाणे, जेव्हा तुम्ही पॉवरप्लेमध्ये आधी दबाव आणत नाही. तेव्हा ते दुसऱ्या संघाला हे जाणून घेण्यास भाग पाडते की, दव पडल्यानंतर सोपं आहे. आज आम्ही आज रात्री स्टंप थोडे जास्त चुकवले. त्यांना लवकर खूप फ्री हिट्स दिले. आम्हाला त्यांची खेळण्याची पद्धत नक्कीच माहिती आहे. त्यांना गोलंदाजांवर हल्ला करायचा असतो आणि तुम्हाला दबावाखाली आणायचे असते. त्यांनी आज रात्री ते खरोखरच चांगले केले. मला वाटते की आम्ही पुरेसे लवकर जुळवून घेऊ शकलो नाही आणि आम्हाला लवकरच मागे टाकण्यात आले.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...