Eknath Shinde: एकनाथ शिंदेंकडून कुणाला कॅबिनेट, कुणाला महामंडळ, ज्या खात्यासाठी बंड ते तरी भाजपकडून मिळणार का? की तहात हरणार?

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष 11 अशा एकूण 51 आमदारांचं बळ आहे. त्यामुळे फडणवीस सरकारमध्ये शिंदे गटाला 18 मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. त्यात शिंदे गटाला 6 कॅबिनेट मंत्रिपदे, एक उपमुख्यमंत्रीपद आणि सहा राज्यमंत्रिपदे देण्यात येणार आहे.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंकडून कुणाला कॅबिनेट, कुणाला महामंडळ, ज्या खात्यासाठी बंड ते तरी भाजपकडून मिळणार का? की तहात हरणार?
एकनाथ शिंदेंकडून कुणाला कॅबिनेट, कुणाला महामंडळ, ज्या खात्यासाठी बंड ते तरी भाजपकडून मिळणार का? की तहात हरणार?
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Jun 30, 2022 | 10:36 AM

मुंबई: उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) हे नवं सरकार स्थापन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या नव्या सरकारचा फॉर्म्युला कसा असेल? शिंदे गटाला किती मंत्रिपदं मिळतील? कुणाला कॅबिनेट मिळणार? कुणाला महामंडळ मिळणार? किती अपक्षांना मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाणार? ठाकरे सरकारमधील किती राज्यमंत्र्यांचं प्रमोशन होणार? किती मंत्र्यांना मनासारखं खातं बदलून मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेच्या विरोधात सत्तेच्या कारणावरून बंड केलं. आता भाजपसोबतच्या सत्तेच्या तहात शिंदे गट जिंकणार की हरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळपर्यंत या सर्व गोष्टी स्पष्ट होणार असून नवं सरकार स्थापन झाल्यानंतर त्याची अधिकृत माहिती दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष 11 अशा एकूण 51 आमदारांचं बळ आहे. त्यामुळे फडणवीस सरकारमध्ये शिंदे गटाला 18 मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. त्यात शिंदे गटाला 6 कॅबिनेट मंत्रिपदे, एक उपमुख्यमंत्रीपद आणि सहा राज्यमंत्रिपदे देण्यात येणार आहे. तसेच चार मंत्रिपदे रिक्त ठेवण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असणार?

नव्या सरकारमध्ये मंत्रिपदे वाटपाचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आला आहे. प्रत्येक सहा आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. मात्र, त्यात ऐनवेळी बदलही होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे.

शिंदे गटाला विधानसभेचं उपाध्यक्षपद

शिंदे गटाला विधानसभेचं उपाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी दीपक केसरकर यांची वर्णी लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

अपक्षांना अधिकाधिक संधी

शिंदे गटासोबत तब्बल 11 अपक्ष आहेत. त्यात बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येणार आहे. तसेच इतर एक दोन अपक्षांना मंत्रिपद देऊन बाकीच्यांना महामंडळ देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

गृहखात्यासाठी आग्रही

गृहखात्यासाठी शिंदे आग्रही होते. मात्र, ठाकरे सरकारमध्ये हे खातं राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं. त्यामुळे आता फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि गृहखातं शिंदे स्वत:कडे घेणार असल्याचं सांगितलं जातं. नगरविकास खात्याच्या बदल्यात गृहखाते द्यावे अशी शिंदे गटाची मागणी आहे. तर महसूल खात्यासाठीही शिंदे गट आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

ठाकरेंची खाती घेणार

उद्धव ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेली सर्व महत्त्वाची खाते शिंदे गटाकडून भाजपकडे मागण्यात आली आहेत. ही महत्त्वाची खाती मिळाली नाही आणि साधी खाती मिळाल्यास त्याचा जनतेत चुकीचा मेसेज जाईल. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जे दिलं तेही भाजपकडून मिळवता आलं नाही. मग असल्या सत्तेचा काय उपयोग? असा सवाल शिवसेनेकडून केला जाऊ शकतो. त्यामुळे शिंदे गट शिवसेनेच्या वाट्याला आलेली सर्व महत्त्वाची खाती मागणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें