Pune Murder : वडिलांनी दुसरे लग्न केल्याचा राग, मुलाने सावत्र आईचा केला किस्सा खल्लास; वाचा काय घडले भोरमध्ये ?

शिवमच्या आईचे निधन झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. मात्र शिवमला वडिलांचे दुसरे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे त्याच्या मनात सावत्र आईबद्दल राग होता. शिवम कामानिमित्त कात्रज येथे राहत होता. मात्र गुन्हा घडला तेव्हा तो भोर येथे वडिलांच्या घरी आला होता.

Pune Murder : वडिलांनी दुसरे लग्न केल्याचा राग, मुलाने सावत्र आईचा केला किस्सा खल्लास; वाचा काय घडले भोरमध्ये ?
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 11:59 PM

पुणे : वडिलांनी दुसरे लग्न केल्याचा राग मनात धरुन मुलाने सावत्र आई (Step Mother)ची डोक्यात दगड घालून हत्या (Murder) केल्याची घटना पुण्यातील भोरमध्ये घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीमुलगा फरार (Absconding) झाला आहे. वडिल रात्रपाळीसाठी गेले होते. यावेळी एक घरी सावत्र आई आणि मुलगा दोघेच होते. याच संधीचा फायदा घेत मुलाने सावत्र आईचा काटा काढला. शिवम (22) असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.

आधी सावत्र आईचा गळा चिरला मग डोक्यात पाटा घातला

शिवमच्या आईचे निधन झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. मात्र शिवमला वडिलांचे दुसरे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे त्याच्या मनात सावत्र आईबद्दल राग होता. शिवम कामानिमित्त कात्रज येथे राहत होता. मात्र गुन्हा घडला तेव्हा तो भोर येथे वडिलांच्या घरी आला होता. वडिल रात्रपाळीला कामावर गेल्यानंतर घरी शिवम, मयत महिला आणि तिच्या दोन मुली होत्या. पहाटे सर्व जण गाढ झोपेत असताना शिवमने सावत्र आईचा गळा चिरला. त्यानंतर तिच्या डोक्यात दगडी पाटा घालून तिची निर्घृण हत्या केली. यावेळी महिलेच्या दोन्ही मुलींनी आरडाओरडा केल्याने आरोपी तेथून पळून गेला. याप्रकरणी भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (A youth killed his stepmother out of anger over his fathers remarriage in Pune)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.