AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO: देशाच्या सर्वात तरुण महापौर Arya Rajendra आणि केरळचे आमदार सचिन देव यांचा साखरपुडा, अत्यंत साधा सोहळा

तिरुअनंतपुरनम् | देशातील सर्वात तरुण महापौर आर्या राजेंद्र (Arya Rajendra) आणि केरळमधील सर्वात तरुण आमदार सचिन देव (Sachin Dev) यांचा साखरपुडा रविवारी पार पडला. अत्यंत साधेपणाने हा सोहळा झाला. केरळमधील सत्ताधारी पक्षाच्या मुख्यालयात या जोडप्यानं एकमेकांच्या हातात अंगठी घातली. यावेळी क्यमुनिस्ट पार्टी (CPIM) या पक्षातील अनेक वरिष्ठ नेते तसेच आर्या राजेंद्र व सचिन देव यांचे […]

PHOTO: देशाच्या सर्वात तरुण महापौर Arya Rajendra आणि केरळचे आमदार सचिन देव यांचा साखरपुडा, अत्यंत साधा सोहळा
Image Credit source: indiaglitz.com
| Updated on: Mar 09, 2022 | 1:00 PM
Share

तिरुअनंतपुरनम् | देशातील सर्वात तरुण महापौर आर्या राजेंद्र (Arya Rajendra) आणि केरळमधील सर्वात तरुण आमदार सचिन देव (Sachin Dev) यांचा साखरपुडा रविवारी पार पडला. अत्यंत साधेपणाने हा सोहळा झाला. केरळमधील सत्ताधारी पक्षाच्या मुख्यालयात या जोडप्यानं एकमेकांच्या हातात अंगठी घातली. यावेळी क्यमुनिस्ट पार्टी (CPIM) या पक्षातील अनेक वरिष्ठ नेते तसेच आर्या राजेंद्र व सचिन देव यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवराची उपस्थिती होती. आर्या यांनी वयाच्या 21 व्या वर्षीच महापौर पदाचा कारभार पाहण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे देशातील सर्वात तरुण महापौर म्हणून त्या चर्चेत आल्या होत्या. तर सचिन देव हेदेखील

Arya Rajendra, Sachin Dev

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे काम करत असताना बालासंघम या ठिकाणी दोघांची ओळख झाली. हे दोघेही तेव्हा बालासंघम येथील चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. सध्या सचिन देव हे कोझिकोडे जिल्हा समिती आणि एसएफआय चे राज्य सचिव आहेत.

दरम्यान, आर्या या छाला परिसरातील कम्युनिस्ट  पार्टीच्या समिती सदस्य असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्य समिती सदस्य आहेत. आर्या राजेंद्र यांनी वयाच्या 21 व्या वर्षीच डिसेंबर 2020 मध्ये तिरुअनंतपुरम महापालिकेच्या महापौर पदाचा कारभार हाती घेतला असून देशातील सर्वात तरुण महापौर म्हणून त्या चर्चेत आल्या होत्या. गेल्या महिन्यात या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आर्या आणि सचिन यांचा साखरपुडा झाला असून पुढील महिन्यात ते विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या-

वारंवार Horn वाजवणाऱ्या महिलेला दाखवलं मिडल फिंगर, तरुणाला नागरिकांकडून मारहाण

Russia Ukraine War : युक्रेनमधून नागरिकांचे पलायन; मन हेलावून सोडणारी दृष्यं

VIDEO: नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही, भाजपच्या मोर्चाआधीच शरद पवारांचं मोठं विधान

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.