AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधी शिवसेनेला दिलासा, पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत महत्त्वाची Update

अंधेरी पोट निवडणुकीत ठाकरे यांना मिळालेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे चिन्ह वापरण्याची मुदत आज २७ मार्च रोजी संपतेय.

सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधी शिवसेनेला दिलासा, पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत महत्त्वाची Update
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 27, 2023 | 12:23 PM
Share

प्रदीप कापसे, मुंबई : केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला प्रतीक्षा लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी येत्या काही दिवसात होईल. निवडणूक आयोगाकडून (Election commission) प्रचंड निराशा झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकमेव आशा सुप्रीम कोर्टाकडून (Supreme court) आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिवसेना पक्ष तसेच सत्तांतराचा खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने निकाल येईपर्यंत नाव आणि पक्ष चिन्हाविषयीची एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाला दिलेलं नाव आणि चिन्ह सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत वापरता येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 ला दिली आहे. हे चिन्ह वापरण्याची मुदत आज संपणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधीच उद्धव ठाकरे यांना आता पुन्हा नव्या चिन्हाच्या आव्हानाला सामोरं जावे लागेल का, अशी चर्चा सुरु होती. मात्र ठाकरे यांना या प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाल्याचं दिसतंय.

अंधेरी पोटनिवडणुकीआधी मिळाली ‘मशाल’

अंधेरी पोटनिवडणुकीआधीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा ठोकला. त्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव तात्पुरतं गोठवलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह देण्यात आलं होतं. तर एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं. सोशल मीडिया कँपेनिंगचा वापर करत उद्धव ठाकरे यांनी नवं मशाल हे चिन्हं गावा-गावात पोहोचवण्याचा प्रयत्न केला.  आज २७ मार्च रोजी ठाकरे गटाची नवं नाव आणि चिन्ह वापरण्याची मुदत संपणार आहे.

धनुष्यबाण आणि शिवसेना नाव शिंदेंचं

17 फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाविषयी महत्त्वाचा निर्णय दिला. धनुष्यबाण आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे गटाला मिळेल असा निकाल देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आयोगाने दबावाखाली निकाल दिला असून तो आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका ठाकरेंनी घेतली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील घटनापीठासमोरील सुनावणी संपली आहे. ठाकरे आणि शिंदे गट दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. सुप्रीम कोर्टातून या महाखटल्यावर लवकरच अंतिम निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला एकमेव आशा असलेल्या या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. तोपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....