AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचा बडा खासदार शिंदेंच्या जवळच्या नेत्याच्या भेटीला; लवकरच…

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला गेले आहेत.

राजकारणात मोठी खळबळ! ठाकरेंचा बडा खासदार शिंदेंच्या जवळच्या नेत्याच्या भेटीला; लवकरच...
uddhav thackeray and eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 19, 2026 | 5:57 PM
Share

Bhausaheb Wakchaure : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. लवकरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे काही नेते, खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. हाच दावा करताना ऑपरेशन टायगरचा सातत्याने उल्लेख केला जात आहे. विशेष म्हणजे एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंचे काही खासदार शिंदे तसेच शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांना भेटल्याचे समोर आले आहे. असे असतानाच आता ठाकरे यांचा आणखी एका खासदाराने एकनाथ शिंदे यांच्या जवळ मानल्या जाणाऱ्या मंत्री उदय सामंत यांना भेटला आहे. सामंत आणि या खासदाराची भेट झाल्याचे समोर आले आहे.

भाऊसाहेब वाकचौरे उदय सामंत यांच्या भेटीला

मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांच्या भेटीला गेले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. वाकचौरे यांच्याआधी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

संजय दीना पाटील यांचा शिंदेंसोबत प्रवास

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय दीना पाटील हेदेखील असेच चर्चेत आले होते. संजय दीना पाटील तसेच एकनाथ शिंदे यांनी एखाच गाडीतून प्रवेश केला होता. हे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हेदेखील शिंदेंच्या भेटीला पोहोचले होते. आता वाकचौरे हे उदय सामंत यांना भेटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेमकं काय घडतंय? भविष्यात ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या पक्षात जाणार का? अशा वेगवेगळ्या प्रश्नांना पेव फुटले आहे.

दरम्यान, ठाकरेंचे एकूण सहा खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात होता. परंत नंतर शिंदे यांनीच ऑपरेशन टायगर सक्रीय नसल्याचे सांगितले होते. परंतु आता या गाठीभेटींनंतर भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...