किरीट सोमय्यांची ‘मातोश्री’वर जाण्याची धडपड, उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई : ईशान्य मुंबईचे भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढल्या आहेत. स्थानिक शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केल्यानंतर, किरीट सोमय्या यांनी ‘मातोश्री’चे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार किरीट सोमय्या यांना भेटण्यास नकार दिला आहे. खासदार किरीट सोमय्या हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी प्रयत्नशील आहेत. […]

किरीट सोमय्यांची मातोश्रीवर जाण्याची धडपड, उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली!
Follow us on

मुंबई : ईशान्य मुंबईचे भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढल्या आहेत. स्थानिक शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केल्यानंतर, किरीट सोमय्या यांनी ‘मातोश्री’चे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार किरीट सोमय्या यांना भेटण्यास नकार दिला आहे.

खासदार किरीट सोमय्या हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर आणि खासदार अनिल देसाई यांच्या माध्यमातून किरीट सोमय्या यांच्याकडून उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, मात्र संजय राऊतांनी भेट घेण्यास नकार दिला.

नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक प्रवीण छेडा हे सुद्धा किरीट सोमय्या यांची बाजू मांडण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले होते.

एकंदरीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका करणाऱ्या किरीट सोमय्या यांना, त्यावेळीची टीका भोवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ईशान्य मुंबईतून पुन्हा एकदा लढण्यास किरीट सोमय्या इच्छुक आहेत. मात्र, महापालिका निवडणुकीत थेट उद्धव ठाकरेंशी पंगा घेतलेल्या किरीट सोमय्या यांना तिकीट मिळणं अवघड होऊन बसलं आहे. आता किरीट सोमय्यांच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच करणार आहेत.

ईशान्य मुंबईतील उमेदवारीवरुन अजूनही भाजपचा निर्णय झालेला नाही. स्थानिक शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने, भाजप काय निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किरीट सोमय्या यांनाच ईशान्य मुंबईतून तिकीट मिळतं की भाजपकडून नवा उमेदवार दिला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.