AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तारीख ठरली !

नुकतंच मुख्यमंत्र्याच्या शपथविधीची तारीख ठरली (Uddhav Thackeray Maharashtra CM) आहे.

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तारीख ठरली !
| Updated on: Nov 26, 2019 | 7:28 PM
Share

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या 4 दिवसात कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं (Uddhav Thackeray Maharashtra CM) महाविकासआघाडीचं (Uddhav Thackeray Maharashtra CM) सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं  आहे. नुकतंच मुख्यमंत्र्याच्या शपथविधीची तारीख ठरली (Uddhav Thackeray Maharashtra CM) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 1 डिसेंबरला महाविकासआघाडीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी होईल. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी पार पडणार आहे. यासाठी महापालिकेला तयारीचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीकडून आज नेतानिवड केली जाणार आहे. यापूर्वी 22 नोव्हेंबरला ठरल्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला सर्वसंमती असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती. आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं आहेत.

उद्धव मुख्यमंत्री, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री?

दरम्यान, महाविकासाआघाडीकडून शिवसेनेचा मुख्यमंत्री तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदं मिळणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे दोघे उपमुख्यमंत्री असतील असं सांगण्यात येत आहे.

राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावलं

राज्यपालांनी विधानसभेचं विशेष सत्र उद्या (27 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजता बोलावलं आहे. यावेळी विधानसभेतील सर्व सदस्यांचा शपथविधी पार पडेल. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर सदस्यांना आमदारकीची शपथ देतील. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीला बहुमत सिद्ध करावं लागेल.

देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा राजीनामा

दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis press conference) यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे, आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी राजीनामा देत आहे, असं सांगितलं. त्यामुळे अवघ्या चौथ्या दिवशी देवेंद्र फडणवीस सरकार कोसळले. बहुमतासाठी आवश्यक आमदार आमच्याकडे नाहीत त्यामुळे मी राजीनामा देतं आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.