विलिनीकरणावर निकाल लावला! प्रकाश आंबेडकरांनी सांगितली आतली गोष्ट; होणार की नाही? थेटच म्हणाले…

प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना आज ठाकरे बंधुंवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी शिंदेंनी सावध रहावं, असा सल्ला दिला. विलीनीकरणावरही त्यांनी भूमिका मांडली.

विलिनीकरणावर निकाल लावला! प्रकाश आंबेडकरांनी सांगितली आतली गोष्ट; होणार की नाही? थेटच म्हणाले...
vba president prakash ambedkar questions bjp over action against thackeray brothers over chhath puja and makes comment on ncp merger
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 5:24 PM

छटपूजेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला थेट सवाल केला आहे. उद्धव ठाकरे आणि मनसेच्या विरोधाची व्याप्ती आता भाषेवर आधारित होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ठाकरे बंधूंवर NSA कायद्यांतर्गत कारवाई होणार की नाही, याबाबत भाजपने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली आहे. भाषेच्या आधारावर देश आणि राज्य फुटण्याची ठिणगी पडली आहे, असं आंबेडकर म्हणाले.

कारवाई झाली नाही, तर भाजपच्या अजेंड्यासाठी ठाकरे बंधूंचा वापर केला जात असल्याची आपली समजूत होईल, असा इशाराही त्यांनी दिला. दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपचे ए टीम आणि बी टीम असल्याचा आरोप करत त्यांचं विलिनीकरण होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. शिंदेंना डावलून सुनेत्रा पवारांचं राजकीय वजन वाढवलं जात असल्याचंही ते म्हणाले.

Loading...

नेमंक काय म्हणाले आंबेडकर?

छट पूजेला याआधी सेनेकडून विरोध झाला होता. आता विरोधाची व्याप्ती वाढली आहे. भाषेला आधारित विरोध वाढतोय. महाराष्ट्रात याआधी छट पूजा केली जात नव्हती. मात्र आता सगळीकडेच साजरी केली जाते. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने विरोध केला आहे. विरोध भाषेवर आधारित आहेत, मराठी माणूस हे करत नव्हता, म्हणून आमचा विरोध आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. भाषा ही देखील सब नॅशनलिटी आहे. भाजप समोरच हे सगळ्यात मोठी आव्हान.

भाषेच्या आधारावर देश फुटले राज्य फुटली. ही ठिणगी पडली आहे. ठिणगी पडणाऱ्यांवर काय कारवाई करणार. ठाकरेंना NSA कायदा लागणार की नाही याचा भाजपने खुलासा करावा. उद्याचं राज्य कॉर्पोरेटच राज्य आहे. हा त्या भागातला एक सण आहे, कारवाई केली. नाही तर याचा अर्थ असा होईल की आपला अजेंडा पुढे, भाजपचा प्लान पुढे करण्यासाठी या दोघांचा वापर केला असे मी मानेन. एकनाथ शिंदेंनी सावध व्हावं. कारवाई झाली नाही तर ही मिलीजुलीभगत आहे असं मी मानेन.

राष्ट्रवादी विलनीकरणावर म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी भाजपच्या A team B team आहेत. सुनेत्रा पवार त्यांचा एकही शब्द भाजप धुडकून लाऊ शकत नाही. शरद पवार मोदींच्या इशाऱ्यावर नाचतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावलेली व्यक्ती आहे. दोन्ही पक्षांचे विलिनीकरण कदापि होणार नसल्याचाही दावा. शिंदेंना डावलून सुनेत्रा पवारांचं वजन वाढल्याने त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं आंबेडकर म्हणालेत.

कर्जत वृक्षतोडीवर भूमिका मांडली

आदिवासींच्या मार्फत सरकार आणि त्या कंपनीवर atrocity कायदा लागू होतो. या संदर्भात्व याचिका दाखल झाली आहे आणि कोर्टामार्फत दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे भूसंपादनाचा कायदा सरकारी प्रकल्पांना लागू होतो खाजगी प्रकल्पांना नाही. सदोष याचिका दाखल करायची आणि कोर्टाला सांगायचं, फेटाळून लावायची आणि एकदा फेटाळली की पुन्हा दाखल करता येत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us