AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : भाजप आमदाराकडून अजितदादांचं तोंडभरुन कौतुक, मग दत्तामामांची थेट ऑफर!

अजित पवार यांच्या चाहत्यांमध्ये फक्त सर्वसामान्य माणूस किंवा कार्यकर्ताच नाही तर नेतेमंडळीही आहेत. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात अजितदादांचं तोंडभरुन कौतुक केलंय. त्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी जयकुमार गोरेंना डायरेक्ट ऑफरच देऊन टाकलीय.

Video : भाजप आमदाराकडून अजितदादांचं तोंडभरुन कौतुक, मग दत्तामामांची थेट ऑफर!
जयकुमार गोरे, अजित पवार, दत्तात्रय भरणे
| Edited By: sagar joshi | Updated on: Jan 02, 2022 | 7:56 PM
Share

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपली कामाची शैली, धडपड आणि रोखठोक मत यामुळे चांगलेच प्रसिद्ध आहेत. तसंच त्यांच्यासमोर एखादी व्यक्ती चुकली, मग ती व्यक्ती कोण आहे याचा विचार न करता सुनावलेले खडे बोल, निर्णय क्षमता आदी बाबींमुळे राष्ट्रवादीसह मित्र पक्ष आणि विरोधी पक्षातही त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या या चाहत्यांमध्ये फक्त सर्वसामान्य माणूस किंवा कार्यकर्ताच नाही तर नेतेमंडळीही आहेत. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. भाजपचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी जाहीर कार्यक्रमात अजितदादांचं तोंडभरुन कौतुक केलंय. त्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी जयकुमार गोरेंना डायरेक्ट ऑफरच देऊन टाकलीय.

जयकुमार गोरेंकडून अजितदादांचं कौतुक

दादांचं काम, दादांचं कर्तृत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राजकीय विचार आमचे विरोधात असतील पण मामा, मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन दादांचा फॅन आहे. मला सांगायला काही अडचण वाटत नाही, आमचं राजकीय जमतं का तर जमतंच नाही. पण दादांची शिस्त, दादांचं धाडस, दादांचा स्पष्टवक्तेपणा… दादांचं दादांकडेच आहे दुसऱ्या कुणाकडे नाही, अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी अजित पवार यांचं कौतुक केलंय.

दत्तामामांकडून जयकुमार गोरेंना ऑफर

तर गोरे यांनी अजितदादांचं कौतुक केल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी त्यावर कोटी केली. भाऊ, तुम्ही ज्याप्रमाणे आज दादांचं कौतुक केलं. भाऊ तुमच्याही कामाची पद्धत मी जवळून पाहिली आहे. तुम्हीपण हाडाचा कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करता. पण भाऊ ठिक आहे. होतात… चुकतो तोच माणूस असतो. आज आमच्या नेत्यांचा उल्लेख तुम्ही एवढा चांगला केलाय. असाच चांगला विचार भविष्यात करा, अशी सल्लावजा ऑफरच दत्तामामांनी जयकुमार गोरेंना दिलीय.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी अजिदादाचं मतदान

दरम्यान, राज्याचं लक्ष असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक रंगलीय. गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे 21 पैकी 21 जागा होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर हवेली तालुक्यात एक मैत्रीपूर्ण लढत आहे. उर्वरित 6 जागांसाठी आज मतदान होत आहे. याच मतदानानंतर अजित पवारांनी एक नेमकी प्रतिक्रिया देत खंत व्यक्त केलीय. काही लोक वेगळा प्रचार करत आहेत. काही जागा मी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने आम्हाला यश आले नाही. आम्ही आमच्या परीने आमच्या विचाराचे लोक निवडूण आणण्याचा प्रयत्न करतोय, असं अजितदादा म्हणाले.

इतर बातम्या :

पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली!, मालमत्ता कराच्या निर्णयावरुन शेलारांचा घणाघात

उद्यापासून मुलांच्या लसीकरणाला सुरुवात; मुंबई महापालिका सज्ज, 9 केंद्रांवर लसीकरणाची सोय

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...