पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली!, मालमत्ता कराच्या निर्णयावरुन शेलारांचा घणाघात

पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबईकरांची आठवण झाली!, मालमत्ता कराच्या निर्णयावरुन शेलारांचा घणाघात
उद्धव ठाकरे, आशिष शेलार

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन आता भाजप नेते जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हाच मुंबई'करां'ची आठवण झाली, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 02, 2022 | 6:50 PM

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर (Property Tax) माफ करण्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरुन आता भाजप नेते जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हाच मुंबई’करां’ची आठवण झाली, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

आशिष शेलार यांनी सरकारच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. त्यातबरोबर त्यांनी सरकारकडे महत्वाची मागणीही केली आहे. आतापासूनच नाही तर वचन दिलेत त्या तारखेपासून 500 चौरर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर पूर्ण माफ करा. अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरं 500 चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही 500चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा? 500 चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांही हीच सुट देणार का?, असे प्रश्न शेलार यांनी विचारले आहेत.

त्याचबरोबर ‘सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये 11 हजार कोटींची सुट दिलीत. बार, पब, रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत. विदेशी दारुला करात 50 टक्के सुट दिलीत. वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली. आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली!’, अशी खोचक टीकाही शेलार यांनी शिवसेनेवर केलीय.

शेलारांच्या टीकेला महापौरांचं प्रत्युत्तर

दरम्यान, शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेवर केलेल्या टीकेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. आशिष शेलार यांनी मुंबईकरांना भरकटवण्याची सुपारी घेतली आहे. ही त्यांची पोटदुखी आहे, म्हणून ते आग लावण्याचे काम करत आहेत. अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिलारांचा समाचार घेतला आहे. आपण मुंबईकरांना काहीतरी चांगले देतोय, भाजपकडे बोलायला काही राहिले नाही, म्हणून शेलार हे सर्व करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

ठाकरे सरकारचा निर्णय काय?

मुख्यमंत्री ठाकरे यांनी 500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा आज केली आहे. 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी 340 कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फुटांचे जवळपास 15 लाख घरे आहेत. ज्यामध्ये 28 लाख कुटुंब राहतात. या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नव्या वर्षात हे मोठं गिफ्ट मिळाले आहे.

इतर बातम्या : 

Prasad Lad : झोपेतच अंगठा मोडला! प्रसाद लाड यांच्यासोबत झोपेत नेमकं झालं तरी काय?

‘केंद्रात लॉबिंग करुन पोस्टिंग करायला ही महाभकास आघाडी आहे का’ अतुल भातखळकरांचा मलिकांना खोचक प्रत्युत्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें