मोठी बातमी: मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, 500 चौ.फुटापर्यंतचा मालमत्ता कर माफ !

नगरविकास खात्याची आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक होती, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा आज केली आहे.

मोठी बातमी: मुंबईकरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, 500 चौ.फुटापर्यंतचा मालमत्ता कर माफ !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 4:45 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना जनतेला मोठं गिफ्ट दिले आहे, शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जनतेसमोर लाईव्ह आले, नगरविकास खात्याची आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक होती, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 500 चौरसफुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करत असल्याची मोठी घोषणा आज केली आहे.

निर्णयाचा फायदा किती कुटुंबांना

500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी 340 कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फुटांचे जवळपास 15 लाख घरे आहेत. ज्यामध्ये 28 लाख कुटुंब राहतात. या कुटुंबांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नव्या वर्षात हे मोठं गिफ्ट मिळाले आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुंबईकर म्हटले की मुंबईकरांनी फक्त करच भरायचे का? मुंबईकर आधीच कर एवढा कर देत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांनी मुंबईवर जे प्रेम केले तेच प्रेम आम्ही पुढे नेत आहोत, आता माझ्या ताण आदित्य ठाकरेंनी कमी केला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. शिवसैनिकांनी दिलेली वचने पाळायला शिवकले आहे, त्यामुळे आम्ही वचन देतो आणि ते पाळतो, लोकांना निवडणुकीत दिलेली बरीच वचने पूर्ण केली आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

या निर्णयामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. मंदीच्या लाटेत अर्थव्यवस्था कोलमडली असताना रिअल इस्टेटलाही महाराष्ट्र सरकारने दिला आहे, कोणी किती काहीही म्हटले तरी, त्या त्यांच्या बाता आहेत, कोरोनाकाळातही आपण विकासाला कात्री लावली नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. शिवसेना वचनाला जागते हे ब्रीदवाक्य कायम आहे, त्यामुळे लोकांमध्ये मोठा मेसेज जाईल, निवडणुका असो किंवा नसो आम्ही सतत काम करत असतो, त्यामुळे मुंबईतला प्रत्येक माणूस शिवसेनेच्या पाठिमागे उभा राहिला आहे, असेही ते म्हणाले.

Royal Enfield, Jawa ते Yezdi, 2022 मध्ये लाँच होणार एकापेक्षा एक टॉप क्लास क्रूझर बाईक

Corona : बॉलिवूडमधल्या ‘या’ सेलिब्रिटींना झालेला कोरोनाचा संसर्ग, खबरदारी घेत केली यशस्वी मात! पाहा Photos

टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेत 31st चं जंगी सेलिब्रेशन पाहा खास PHOTOS

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.