AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Raut: राऊत कुटुंबीयांच्या अडचणी वाढणार? मोठी अपडेट समोर; थेट सिंधुदुर्गातूनच…

Vinayak Raut: माजी खासदार विनायक राऊत यांचे कुटुंब सध्या चांगलेच चर्चेत आहे. राऊतांची सून गिरिजा यांनी केलेल्या आरोपांनंतर आता खळबळजनक अपडेट समोर येत आहे.

Vinayak Raut: राऊत कुटुंबीयांच्या अडचणी वाढणार? मोठी अपडेट समोर; थेट सिंधुदुर्गातूनच...
विनायक राऊतImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 14, 2026 | 1:39 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचे कुटुंब चांगलेच चर्चेत आहे. विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले. गिरिजा राऊत यांनी ठाणे येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता राऊत यांच्या कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कौटुंबिक प्रकरणात आरोपी असलेल्या भोंदू फिरोज बाबा शेख याचा साथीदार राम यल्लाप्पा वडार याला ठाणे पोलिसांनी सिंधुदुर्गातून थेट ताब्यात घेतले आहे.

सिंधुदुर्गातून भोंदूबाबाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम यल्लाप्पा वडार याने गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. ठाणे पोलिसांच्या एका विशेष पथकाने सिंधुदुर्गातून त्याला अटक केली. या प्रकरणात माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. आज फिरोज शेख याची पोलिस कोठडी संपत आहे. त्यानुसार त्याला आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ठाणे पोलिस फिरोज शेख यांची अधिक तपासासाठी पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी ठाणे सत्र न्यायालयात करणार आहेत.

या प्रकरणात नवीन आरोपीच्या अटकेमुळे आणि त्याने दिलेल्या कबुलीमुळे संपूर्ण घटनाक्रम अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पोलिस आता राम यल्लाप्पा वडार याच्या कबुलीच्या आधारे अधिक तपास करत आहेत. फिरोज शेख याची कोठडी वाढवण्यात आल्यास या प्रकरणात आणखी नावे आणि नवनवे खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राऊत कुटुंबीयांवर कौटुंबिक प्रकरणातून निर्माण झालेल्या या गुन्ह्यातील तपास वेगाने सुरू असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

गिरिजा राऊत यांचे आरोप काय होते?

गिरिजा राऊत यांनी तक्रारीमध्ये अघोरी पूजेचा उल्लेख केला आहे. त्यांना जबरदस्तील अघोरी पुजेला बसवण्यात आल्याचे गिरिजा यांनी सांगितले आहे. त्यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत, अघोरी पूजेचं खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही. आम्हाला ते मान्यच नाही. आईवडिल असताना अघोरी प्रकार कसे सहन केले. तिच्या आईवडिलांनी कसे सहन केले. न्याय देवता न्याय देईल अशी आशा आहे असे म्हटले. पण आता भोंदू फिरोज शेखला अटक झाल्यानंतर या प्रकरणात नवे वळण येण्याची शक्यता आहे.

Follow Us
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट..
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट...
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील बैठकीत...
थेट "भावी कॅबिनेट मंत्री..." बीडमधील मुंडेंच्या बॅनर्सची जोरदार चर्चा,
Dhananjay Munde | थेट
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदार थेट दिल्लीत...
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदारांना थेट दिल्लीत... अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा... नेमकं काय म्हणाले?