पवार साहेब तुमच्या लढाईने प्रेरणा मिळाली, झारखंड जिंकणाऱ्या हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया

हेमंत सोरेन यांनी महाराष्ट्रातील शरद पवारांच्या लढाईपासून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं (we get inspired from sharad pawar said JMM Hemant Soren) म्हटलं.

sharad pawar and JMM Hemant Soren, पवार साहेब तुमच्या लढाईने प्रेरणा मिळाली, झारखंड जिंकणाऱ्या हेमंत सोरेन यांची प्रतिक्रिया

मुंबई : झारखंडमध्ये भाजपची सत्ता उलथवून लावणारे झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन हे आजच सत्तास्थापनेचा दावा करणार (we get inspired from sharad pawar said JMM Hemant Soren)  आहेत. झारखंडमध्ये शिबू सोरेन यांचे सुपुत्र हेमंत सोरेन यांनी सत्ताधारी भाजपला धोबीपछाड दिली. हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळालं. काँग्रेस आघाडीने 81 पैकी 47 जागा मिळवत, विजय खेचून आणला. सत्ताधारी भाजपला केवळ 25 जागांवर समाधान मानावं (we get inspired from sharad pawar said JMM Hemant Soren)  लागलं.  झारखंडमध्ये 41 हा बहुमताचा आकडा आहे.

झारखंडमधील या विजयानंतर हेमंत सोरेन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन सोरेन यांचं अभिनंदन केलं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या कौतुकानंतर, हेमंत सोरेन यांनी आभार व्यक्त करताना, जी प्रतिक्रिया दिली आहे, त्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. हेमंत सोरेन यांनी महाराष्ट्रातील शरद पवारांच्या लढाईपासून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं (we get inspired from sharad pawar said JMM Hemant Soren) म्हटलं.

शरद पवार यांनी हेमंत सोरेन यांचं अभिनंदन करताना, “झारखंड निवडणुकीत महाआघाडीच्या विजयाबद्दल हेमंत सोरेन यांचं अभिनंदन. झारखंडमधील निकाल हा देशातील भाजपची पीछेहाट अधोरेखित करत आहे” असं ट्विट केलं.

तुमच्यापासून प्रेरणा

शरद पवारांच्या या ट्विटला हेमंत सोरेन यांनी रिप्लाय दिला. हेमंत सोरेन म्हणाले, “ शरद पवारजी, तुम्ही महाराष्ट्रात जी लढाई लढली, त्यापासून आम्हा सर्वांना प्रेरणा मिळत आहे” असं म्हटलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी राज्यभर प्रचारसभांचा धडका लावला होता. साताऱ्यातील भर पावसातील सभा तर देशभरात गाजली होती. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल 54 जागांवर विजय मिळाला. राष्ट्रवादीच्या 13 जागा वाढल्या.

शरद पवारांचा हा संघर्ष तरुणांनाही लाजवणारा होता. त्यामुळेच शरद पवारांच्या या संघर्षाचा दाखला देत, हेमंत सोरेन यांनी पवारांकडून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं म्हटलं (we get inspired from sharad pawar said JMM Hemant Soren)  आहे.

झारखंड विधानसभा निकाल

या निवडणुकीत एकट्या झारखंड मुक्ती मोर्चाला 30 जागांवर विजय मिळाला. हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप 25 जागांसह दुसऱ्या, तर काँग्रेस 16 जागांसह तिसऱ्या जागी राहिली.

झारखंड विधानसभा निवडणूक निकाल – 2019

पक्ष  विजयी

 • एजेएसयू पार्टी – 2
 • भाजप – 25
 • सीपीआय-M – 01
 • अपक्ष – 02
 • काँग्रेस -16
 • झारखंड मुक्ती मोर्चा – 30
 • झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) – 03
 • राष्ट्रवादी काँग्रेस- 01
 • राष्ट्रीय जनता दल (राजद) – 01
  एकूण – 81
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *