AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋतुजा लटके यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार असल्याचा दावा न्यायालयात महापालिकेच्या वतीने करण्यात आला होता. दरम्यान लटके यांच्याविरोधात नेमकी तक्रार कोणी दाखल केली हे आता समोर आलं आहे.

ऋतुजा लटके यांच्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2022 | 8:36 AM
Share

मुंबई : सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे.  शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र त्यांचा राजीनामा महापालिकेने स्विकारण्यास नकार दिला. याविरोधात ऋतुजा लटके (Rituja Latke) यांनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली. ऋतुजा लटके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने महापालिकेला (BMC) दणका देत लटके यांचा राजीनामा आज सकाळी 11 पर्यंत स्विकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र दुसरीकडे याच सुनावणीदरम्यान ऋतुजा लटके यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार आहे, असा दावा महापालिकेच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता.

तक्रारदाराला कोणीच ओळखत नसल्याचा दावा

ऋतुजा लटके यांच्याविरोधात नेमकी तक्रार कोणी दाखल केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न टीव्ही 9  मराठीने केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऋतुजा लटके यांच्याविरोधात रमलू चिन्नय्या नावानं तक्रार दाखल झाली होती. या तक्रार अर्जावर अंधेरीमधील एका चाळीचा पत्ता देण्यात आला होता. याबाबत स्थानिकांशी चर्चा केली असता रामलू चिन्नय्या या व्यक्तीला तिथे कोणही ओळखत नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

दरम्यान अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...