AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagyashree Patwardhan: राजकुमाराऐवजी राजकुमारीने केली पूजा, वाद पेटला! कोण आहे भाग्यश्रीचा दत्तक भाऊ?

Bhagyashree Patwardhan: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन या चर्चेत आहेत. त्यांनी श्री गणपती पंचायतन मंदिरात आरती केल्यानंतर त्यांचे वडील विजयसिंहराजे पटवर्धन संतापले. त्यानंतर त्यांनी दत्तक पुत्र युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना वारस म्हणून घोषित केले.

Bhagyashree Patwardhan: राजकुमाराऐवजी राजकुमारीने केली पूजा, वाद पेटला! कोण आहे भाग्यश्रीचा दत्तक भाऊ?
Bhagyashree PatwardhanImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 24, 2026 | 10:57 AM
Share

सांगलीच्या ऐतिहासिक पटवर्धन राजघराण्यात गणेशोत्सवादरम्यान पूजेच्या मानावरून मोठा वाद उफाळला आहे. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांनी श्री गणपती पंचायतन मंदिरात आरती केल्यानंतर त्यांचे वडील विजयसिंहराजे पटवर्धन यांनी जाहीर आक्षेप घेतला. त्यांनी स्पष्ट केले की मंदिरात पूजा-आरती करण्याचा अधिकार आता त्यांच्या दत्तक पुत्र युवराज आदित्यराजे पटवर्धन यांचाच आहे. त्यानंतर युवराज आदित्यराजे कोण आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला. चला जाणून घेऊया…

गणेश चतुर्थीच्या दिवशी भाग्यश्री चार वर्षांनंतर सांगलीत परत आल्या आणि कुटुंबाच्या आराध्य दैवताच्या मंदिरात उत्सवमूर्तीची आरती करु लागल्या. यावेळी वडील विजयसिंहराजे तेथे उपस्थित नव्हते. भाग्यश्री यांनी सांगितले की वडिलांच्या तब्येतीमुळे त्यांनी परंपरेनुसार पूजेत भाग घेतला. मात्र वडिलांनी याला परंपरा मोडण्याचे कृत्य म्हटले. त्यांनी म्हटले, “आरतीचा मान माझा आणि राणीसाहेबांचा आहे. आदित्यराजे हेच माझे एकमेव कायदेशीर वारस आहेत. त्यांना डावलून पूजा करणे योग्य नाही.” त्यानंतर आदित्य राजे कोण आहेत? अशी चर्चा सुरु झाली.

कोण आहे आदित्यराजे?

विजयसिंहराजे आणि राणी राजलक्ष्मीराजे पटवर्धन यांना तीन मुली आहेत – भाग्यश्री, मधुवंती आणि पूर्णिमा. कुटुंबात मुलगा नसल्याने त्यांनी आदित्यराजेंना दत्तक घेतले. आदित्यराजे हे राजलक्ष्मीराजेंचे भाचे (मामाचा मुलगा) जयदीप अभ्यंकर यांचे पुत्र आहेत. जयदीप अभ्यंकर हे मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक आहेत. आदित्यराजे यांचा जन्म २००८ साली झाला. सध्या ते सुमारे १६-१८ वर्षांचे आहेत.

दत्तक विधी सुमारे दोन वर्षांपूर्वी (जानेवारी २०२४ च्या आसपास) सांगलीतील माळबंगल्यात झाला. त्यानंतर त्यांना युवराज आदित्यराजे पटवर्धन हे नाव देण्यात आले आणि सांगली संस्थान व कुटुंबाच्या परंपरांचा अधिकृत वारस म्हणून घोषित करण्यात आले. राणी राजलक्ष्मीराजे यांनीही या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्या म्हणाल्या, “आम्हाला मुलगा नव्हता म्हणून आदित्यराजेंना दत्तक घेतले. आम्ही त्यांना स्वतःच्या मुलासारखे वाढवत आहोत. ते आमचे एकमेव वारस आहेत.”

पटवर्धन कुटुंब आणि मंदिराची परंपरा

सांगली संस्थानचे पहिले शासक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन मानले जातात. ब्रिटिश काळात हे स्वतंत्र संस्थान होते. विलीनीकरणानंतर राजेशाही संपली असली तरी पटवर्धन कुटुंब धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जोपासत आहे. श्री गणपती पंचायतन मंदिर हे घराण्याचे आराध्य दैवत आहे. मंदिराचे बांधकाम १८१३ मध्ये सुरू झाले आणि १८४३ मध्ये गणपतीची प्रतिष्ठापना झाली. घराण्याकडूनच येथील पूजा-उत्सव साजरे केले जातात.

विजयसिंहराजे यांनी आदित्यराजेंना हिंदू वारसा कायदा आणि गणपती पंचायतन कायद्यानुसार कायदेशीर वारस म्हणून मान्यता दिल्याचे सांगितले आहे. त्यांनी भाग्यश्री यांना आदित्यराजेंना मान्यता देण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणामुळे सांगली संस्थानच्या पूजेच्या मानावरून आणि उत्तराधिकारी पदावरून कौटुंबिक मतभेद चर्चेत आले आहेत. दोन्ही बाजूंनी आपापली भूमिका स्पष्ट केली असली तरी वाद अद्याप शमलेला नाही.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप