सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसच मफलरमॅन? रोहित पवार यांनी अखेर अजितदादा प्रकरणात तो फोटो बाहेर काढला, मोठी खळबळ

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्याने अजित पवार यांच्या अपघाताबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा रोहित पवार यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक फोटो दाखवला आहे.

सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसच मफलरमॅन? रोहित पवार यांनी अखेर अजितदादा प्रकरणात तो फोटो बाहेर काढला, मोठी खळबळ
Rohit Pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 16, 2026 | 5:48 PM

राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचा बारामती विमानतळावर भीषण विमान अपघात झाला होता. या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून या अपघाताबद्दल सातत्याने संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी या प्रकरणात आज पुन्हा एकदा एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एक फोटो दाखवला आहे. या फोटोमुळे मोठी खळबळ उडाली आहे.  या फोटोमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मफलर घातलेली दिसत आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 

Loading...

जर मी  स्वतःच्या काकाला न्याय देऊ शकत नसेल आणि कोम्प्रोमाईज करत असेल तर मी सामान्य नागरिकाला न्याय देऊ शकत नाही. हे सगळं समोर आल्यानंतर मला कदाचित राजकीय परिणामांना समोर जाव लागू शकत. पण मला त्याची चिंता नाही. मी ज्या व्यक्तीच नाव घेतोय ती अजित दादांच्या अपघातामागे आहे असे म्हणत नाहीये पण संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या कंपनीला ही व्यक्ती नक्कीच वाचवते आहे, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणाचा तपास का होत नाही, तर त्याचं कदाचित मुख्य कारण असं आहे, की व्हिके सिंगच्या जवळ आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असं आमचं ठाण मत आहे. राघव हा रोहित सिंगचा अतिशय घनिष्ठ मित्र आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागणार होता, त्याच दिवशी आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री हे जयपूरला जाऊन त्या लग्नात फक्त दीडतासांसाठी सहभागी झाले होते. आता माझ्या एखाद्या भावाचं लग्न असतं, बहिणींच लग्न असतं तरी मी गेलो नसतो. निवडणुकीमुळे एवढं प्रेशर माझ्यावर असलं असंत, परंतु तरी देखील ते तिथे गेले. का? तर कदाचित संबंध हे फार महत्त्वपूर्ण होते, जेवळचे होते, असंही यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us