VIDEO : UT वाईट आहेत, वर्षा बंगल्यांच्या भिंतींवर उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह लिखाण!

फडणवीस यांची लहान मुलगी दिवीजा राहत असलेल्या खोलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये आक्षेपार्ह लिहिलं असल्याची माहिती समोर आली (varsha banglow wall drawing) आहे.

VIDEO : UT वाईट आहेत, वर्षा बंगल्यांच्या भिंतींवर उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह लिखाण!
Namrata Patil

|

Dec 28, 2019 | 11:29 AM

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी आपली खंत व्यक्त केली (varsha banglow wall drawing) आहे. आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. त्यात आता वर्षा बंगल्यांच्या भितींचीही भर पडली आहे. फडणवीस यांची लहान मुलगी दिवीजा राहत असलेल्या खोलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये आक्षेपार्ह लिहिलं असल्याची माहिती समोर आली (varsha banglow wall drawing) आहे.

राज्याचं मुख्यमंत्री पद गेल्यामुळे फडणवीस कुटुंबाला वर्षा बंगला सोडावा लागला होता. वर्षा हे सरकारी निवास्थान सोडताना दिरंगाई केली होती. त्यानंतर हा बंगला नवीन मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे यांना राहण्यासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी या बंगल्याची पाहणी केली असता काहींना वर्षा बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिहिलं असल्याचे (varsha banglow wall drawing) आढळले.

दिविजा फडणवीस राहत असलेल्या खोलीच्या भिंतीवर Who is UT? UT Is mean? Shut Up अशी वाक्य लिहिण्यात आली आहे. Who is UT? युटी कोण आहेत, UT Is mean? युटी वाईट आहेत असे वर्षा बंगल्याच्या भितींवर लिहिलं आहे. BJP is rock, Bjp and shivsena were friend, Fadnavis rock असेही या भितींवर लिहिलं आहे.

दिविजा राहत असलेल्या खोलीमधील सर्वच भिंतीवर अशाप्रकारे लिहिले आहे.  अशाप्रकारे भिंतीवर लिहिलेल्या या वाक्यांमुळे फडणवीस कुटुंब उद्धव ठाकरेंचा किती द्वेष करु लागलेत हे दिसून येत (varsha banglow wall drawing) आहेत.

काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेदरम्यान “उद्धव ठाकरे यांना तुम्ही वर्षावर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला जाणार का?” असा प्रश्न विचारला (CM Uddhav Thackeray varsha bungalow) होता. उद्धव ठाकरेंनी या प्रश्नाचे अत्यंत हसतखेळत उत्तर दिलं. “मी वर्षावर फक्त कामासाठी जाणार” असे त्यांनी सांगितले.

“मातोश्रीबद्दल मी काही वेगळं सांगणार नाही. मातोश्रीचे महत्त्व काही वेगळं आहे. पण एखादी जबाबदारी घेतल्यानंतर ती पार पाडण्यासाठी जे गरजेचे असते म्हणजेच जनतेला भेटणं किंवा इतर ज्या काही गोष्टी त्या मी करणार. त्यामुळे वर्षावर जेव्हा जेव्हा कामासाठी जाणे गरजेचे आहे. तेव्हा मी तिथे जाणार,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें