AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Corona : पुण्यात 10 दिवसात 625 बेडचे जम्बो रुग्णालय उभं करणार, विभागीय अधिकाऱ्यांची माहिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जम्बो रुग्णालय उभारण्याचे काम सुरु करण्यात आले (Jumbo Hospital in Pune) आहे.

Pune Corona : पुण्यात 10 दिवसात 625 बेडचे जम्बो रुग्णालय उभं करणार, विभागीय अधिकाऱ्यांची माहिती
| Edited By: | Updated on: Aug 01, 2020 | 8:20 AM
Share

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जम्बो रुग्णालय उभारण्याचे काम सुरु करण्यात आले (Jumbo Hospital in Pune) आहे. 20 ऑगस्टपर्यंत दोन जम्बो रुग्णालय उभं करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. पहिली जम्बो फॅसिलिटीज पिंपरी-चिंचवडमध्ये तयार केली जाईल. पुढील दहा दिवसात पिंपरी-चिंचवडला 625 बेडची जम्बो फॅसिलिटीज रुग्णालय उभारणार आहे, अशी माहिती विभागीय विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी दिली (Jumbo Hospital in Pune).

पिंपरी चिंचवडला 525 ऑक्सीजन बेड आणि 60 आयसीयू बेड उपलब्ध केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर आता कामाला वेगाने सुरुवात झाली आहे, असंही सौरभ राव यांनी सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

ससून रुग्णालयात सध्या 446 बेड रुग्णांसाठी वापरले जात आहे. पुढील तीन दिवसात ससूनला 870 बेड्स रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येतील. या संदर्भात आवश्यक वैद्यकीय कर्मचारी, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

राज्यात 1 ऑगस्टपासून अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. मात्र शहरातील सम-विषम दुकान संदर्भात सरकारच्या निर्देशानुसार निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, राज्यात काल (31 जुलै) दिवसभरात कोरोनाचे तब्बल 10 हजार 320 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 22 हजार 118 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे 30 जुलैला दिवसभरात राज्यात सर्वाधिक 11 हजार 147 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे दोन दिवसात तब्बल 21 हजार 467 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

संबंधित बातम्या : 

राज्यात दिवसभरात 10 हजार, 24 दिवसात 2 लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 4 लाखांच्या पार

Pune | “मलाही अनेक आजार, पण मागे हटलो नाही”, पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर निवृत्त

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.